गोवा ते अयोध्या ५४ दिवसांच्या पदयात्रेला आरंभ
By काशिराम म्हांबरे | Published: January 3, 2024 01:00 PM2024-01-03T13:00:56+5:302024-01-03T13:01:53+5:30
चार आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
काशिराम म्हांबरे, म्हापसा: श्री साई भक्त परिवार गोवाच्या वतिनेआयोजित गोवा ते अयोध्या या ५४ दिवसांच्या ऐतिहासिक पदयात्रेला म्हापसा येथील टॅक्सी स्थानकावरून भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे तसेच इतर चार आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
आज ३ जानेवारी रोजी सुरु झालेली ही पदयात्रा अंदाजीत अडीच हजार किलो मिटरचा प्रवास करुन २५ फेब्रुवारी रोजी अयोध्येत पोहचणार आहे. तेथून नंतर ही यात्रा मथूरेकडे प्रयाण करणार आहे. म्हापसा येथून सुरु झालेली ही पदयात्रा शिर्डी , शेगांव, बागेश्वर धाम मार्ग अयोध्येकडे जाणार आहे.
श्री साई भक्त परिवार गोवाच्या वतिने गोवा ते शिर्डी अशी पदयात्रा मागील १० वर्षा पासून आयोजित केली जाते. यदांच्या ११ व्या वर्षी ही पदयात्रा अयोध्येपर्यंत नेण्यात येणार आहे. गोवा भरातील श्री साई भक्त यात्रेत मोठ्या संखेने सहभागी झाले आहेत.
या कार्यक्रमाला तानावडे यांच्या सोबत उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक रुदोल्फ फर्नांडिस, अॅड. कार्लुस फरेरा तसेच म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, दामू नाईक, शाहू महाराज यात्रेचे संयोजक निलेश वेर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संबोधीत करताना मान्यवरांनी ऐतिहासिक अशा या यात्रेचे कौतुक केले. गोव्यातील पूण्यभुमीसाठी ही अभिमानास्पद अशी गोष्ट असून साई भक्तांचा भावार्थ, इच्छा शक्ती तसेच असलेल्या भक्तीच्या जोरावर हे शक्य झाल्याचे नमुद केले. श्री रामांच्या जयघोषाने तसेच साईबाबांच्या आरतीतून नंतर यात्रेला शुभारंभ करण्यात आला.