अरेबियन ट्रॅव्हल मार्केट दुबई येथे गोवा पर्यटन दालनाने दिले पुनर्संचयित पर्यटन उपक्रमांना बळ
By समीर नाईक | Published: May 12, 2024 03:45 PM2024-05-12T15:45:30+5:302024-05-12T15:45:43+5:30
गोवा पर्यटन दालनाला इंडोनेशिया प्रजासत्ताकचे पर्यटन आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमी मंत्री सँडियागा युनो यांच्याशी संवाद साधण्याचा मान मिळाला.
पणजी: गोवा पर्यटन विभागाने, दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ६ ते ९ मे २०२४ या कालावधीत आयोजित प्रतिष्ठित अरेबियन ट्रॅव्हल मार्केट (एटीएम) दुबई २०२४ मध्ये राज्याच्या शाश्वत पर्यटन उपक्रमांचे प्रदर्शन केले. गोवा पर्यटन दालनाचे उद्घाटन संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय राजदूत संजय सुधीर, गोवा पर्यटन विभागाचे संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका, गोवा पर्यटन मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शॉन मेंडिस, गोवा पर्यटन विभागाच्या सहाय्यक पर्यटन अधिकारी श्रीमती चित्रा वेंगुर्लेकर आणि अतुल्य भारतचे इतर प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
हा समारंभपूर्ण कार्यक्रम एकता आणि सहयोगी भावनेचे प्रतीक होता, जो शाश्वत पर्यटन उपक्रमांना चालना देतो. गोव्याचा सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित करण्याच्या कटीबद्धतेला बळकटी देतो. गोवा पर्यटन दालनाने शाश्वत पर्यटन पद्धतींना चालना देण्याच्या उद्देशाने आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी अभ्यागतांना मोहित केले, तसेच गोव्याच्या विविध प्रस्तावांमध्ये समुद्रकिना-याच्या पलीकडे सर्वसमावेशक झलक दाखवली.
गोव्यातील उत्तम अज्ञात स्थळांचा शोध घेण्यापासून ते अध्यात्मिक पर्यटनापर्यंत, दालनामध्ये पुनर्संचयित पर्यटन संकल्पना, ११ मंदिरांसह एकादश तीर्थ सर्किट आणि आगामी सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शनाची माहिती दर्शविली गेली.
एटीएम दुबई येथे आम्हाला मिळालेल्या प्रचंड स्वागताने आमचे शाश्वत पर्यटन प्रयत्न जगभरातील प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी एक मौल्यवान व्यासपीठ म्हणून काम केले. पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक या दोन्ही गोष्टींची आदर करणारे स्थळ म्हणून गोवा ओळखले जात आहे. संरक्षण आणि उद्योगातील नेते, प्रवासी आणिभागधारकांसोबतच्या आमच्या संवादामुळे शाश्वत पर्यटन उपक्रमांना पुढे नेण्याचा आमचा संकल्प बळकट झाला आहे. असे पर्यटन विभागाचे संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका यांनी यावेळी सांगितले.
गोवा पर्यटन दालनाला इंडोनेशिया प्रजासत्ताकचे पर्यटन आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमी मंत्री सँडियागा युनो यांच्याशी संवाद साधण्याचा मान मिळाला. विचारांच्या देवाणघेवाणीमुळे पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक प्रशंसा वाढवणे आणि पर्यटन अनुभवांची गुणवत्ता वाढवणे यासाठी परस्पर सहमती झाली. जागतिक स्तरावर शाश्वत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध पर्यटन वातावरणाच्या दिशेने दॄढ संबंध वाढवणे आणि संयुक्त प्रयत्नांना चालना देण्याचे काम येथे झाले, असेही अंचिपाका यांनी पुढे सांगितले.