Goa: गोव्यात दिवाळीच्या सप्ताहात बुडणाऱ्या १७ पर्यटकांसह कझाकिस्तानच्या दोन नागरिकांना वाचवले
By किशोर कुबल | Published: November 14, 2023 11:02 PM2023-11-14T23:02:18+5:302023-11-14T23:20:16+5:30
Goa News: दिवाळीच्या वीकेंडला गोव्याच्या किनारपट्टीवर १७ पर्यटकांसह कझाकिस्तानच्या दोन नागरिकांना बोटांना वाचवण्यात आले.
- किशोर कुबल
पणजी - दिवाळीच्या वीकेंडला गोव्याच्या किनारपट्टीवर १७ पर्यटकांसह कझाकिस्तानच्या दोन नागरिकांना बुडताना वाचवण्यात आले. हरमल किनाऱ्यावर कझाकिस्तानचे दोन नागरिक, जे समुद्रात पोहताना प्रवाहात अडकले होते, त्यांना किनार्यावर पोहोचता आले नाही तेव्हा दृष्टी लाईफ सेविंग कंपनीचे जीवरक्षक प्रियांश ग्वास आणि सुहास गवस यांनी रेस्क्यू ट्यूब आणि सर्फबोर्डच्या मदतीने या दोघांची सुटका केली. याच समुद्रकिनाऱ्यावर पुण्यातील दोन तरुणांना वाचवले. हरमल समुद्रकिनाऱ्यावरील वेगवेगळ्या घटनांमध्ये आणखी दोघांना वाचवण्यात आले. यात दिल्लीतील २६ वर्षीय तरुणाचा समावेश होता आणि दुसऱ्या घटनेत बेंगळुरू येथील २५ वर्षीय तरुणाचा समावेश होता.
कळंगुट किनाऱ्यावर २१ ते २४ वर्षे वयोगटातील उत्तर प्रदेशमधील तीन महिलांना वाचवले. दृष्टी सागरी जीवरक्षक नकुल उसापकर, शुभम केळुसकर आणि कार्तिक नाईक यांनी तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली, त्यांना पोहण्यासाठी धडपडताना आणि पाण्यात वाहून जाण्याचा धोका होता. तिन्ही महिलांना किनाऱ्यावर आणून प्राथमिक उपचार करण्यात आले.
पंजाबमधील २९ वर्षीय पुरुषाला कळंगुट येथे वाचवले. अहमदाबादमधील आणखी एका २५ वर्षीय तरुणालाही याच समुद्रकिनाऱ्यावर वाचवण्यात आले. मांद्रे येथे एका जोडपे किना-यावर पोहण्याचा प्रयत्न करताना बुडताना या जोडप्याला सुखरूपपणे किनाऱ्यावर परत आणले. आगोंदा येथे तसेच केळशी मुलगी आणि सिकेरी बीचवर तीन एकल बचाव करण्यात आले.
कळंगुट समुद्रकिनारी गर्दीत बेपत्ता झालेल्या पाच आणि नऊ वर्षांच्या दोन मुलींना दृष्टी सागरी जीवरक्षकांनी शोधून काढले आणि त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले.