गोवा विद्यापीठाच्या निवडणुका जाहीर, निकाल त्याचदिवशी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 08:19 PM2018-09-23T20:19:16+5:302018-09-23T20:21:35+5:30
गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी विद्यार्थी मंडळाच्या (इसी) निवडणुका ३० आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार आहेत. त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकांसाठी अर्जासाठी २४ आॅक्टोबरला अंतिम तारीख आहे.
पणजी : गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी विद्यार्थी मंडळाच्या (इसी) निवडणुका ३० आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार आहेत. त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकांसाठी अर्जासाठी २४ आॅक्टोबरला अंतिम तारीख आहे. उमेदवारांच्या अर्जाची छाननी २५ आॅक्टोबरला होईल. तर अर्ज मागे घेण्यासाठी २६ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत कालावधी आहे.
गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी वर्ग प्रतिनिधी (युसीआर) निवडणुका १० आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार असून निकाल त्याचदिवशी जाहीर केला जाईल. या निवडणुकांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ४ आॅक्टोबर आहे. ५ आॅक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल आणि जर उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा असल्यास त्यांना ८ आॅक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
विद्यापीठ विभाग प्रतिनिधी (युएफआर) निवडणुकांसाठी १३ आॅक्टोबरला अर्जाची शेवटची तारीख आहे. १५ आॅक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल. १६ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणुका १७ आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार आहेत. त्याचदिवशी निकाल जाहीर केला जाईल.
पदव्यत्तर विद्यार्थी संघटनेच्या गट प्रतिनिधी (जीआर) निवडणुकांसाठी अर्जाची १ आॅक्टोबर, ३ रोजी छाननी, अर्ज मागे घेण्यासाठी ४ आॅक्टोबरला आणि निवडणुका ९ आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी समिती (पीजीएसयु) निवडणुकांसाठी अर्ज करण्याची ११ आॅक्टोबर अंतिम तारीख, अर्जाची छाननी १२ आॅक्टोबर, अर्ज मागे घेण्यासाठी १५ आॅक्टोबर तारीख आहे व १६ आॅक्टोबर दुपारी २ ते सायंकाळी ४ पर्यंत निवडणुका होतील.