गोमंतकीयांना मान्सूनची प्रतीक्षा, लाखो पर्यटकांची समुद्रस्नानासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 07:55 PM2018-05-21T19:55:18+5:302018-05-21T19:55:18+5:30

राज्यातील वातावरणात उष्मा खूप वाढला आहे. असह्य उकाडय़ामुळे गोमंतकीयांना मान्सूनची प्रतिक्षा लागून राहिली आहे. समुद्रस्नान करण्यासाठी लाखो पर्यटकांनी सध्या गोव्यातील समुद्रकिना-यांवर गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

Goa waits for monsoon | गोमंतकीयांना मान्सूनची प्रतीक्षा, लाखो पर्यटकांची समुद्रस्नानासाठी गर्दी

गोमंतकीयांना मान्सूनची प्रतीक्षा, लाखो पर्यटकांची समुद्रस्नानासाठी गर्दी

Next

पणजी - राज्यातील वातावरणात उष्मा खूप वाढला आहे. असह्य उकाडय़ामुळे गोमंतकीयांना मान्सूनची प्रतिक्षा लागून राहिली आहे. समुद्रस्नान करण्यासाठी लाखो पर्यटकांनी सध्या गोव्यातील समुद्रकिना-यांवर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. मोठय़ा संख्येने देशी पर्यटक गोव्यात आले आहेत.

एरव्ही साधारणत: दि. 7 जूनपासून गोव्यात मान्सूनचे आगमन होत असते. यावेळी लवकर पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे. अलिकडे अधूनमधून गोव्यात ढगाळ वातावरण अनुभवास येत आहे. सोमवारीही दुपार्पयत ढगाळ वातावरण होते. मध्यंतरी रात्रीच्यावेळी राज्यातील काही भागांमध्ये पाऊसही पडला. सत्तरी, फोंडा व डिचोली या तालुक्यात वादळी वा:याचा अनुभव लोकांनी घेतला. सध्या वातावरणात उकाडा पूर्णपणो भरून राहिला आहे. घरात वातानुकूलित यंत्रणा लावल्याशिवाय राहता येत नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शहरी भागांतील गोमंतकीय व्यक्त करत आहेत.

अनेक गोमंतकीय कुटूंबियांनी सध्या थंड हवेची ठिकाणी गाठली आहेत. शेकडो गोमंतकीय केरळला गेले आहेत. काहीजणांनी सिमला, मनाली, काश्मिरची वाट धरली आहे. महाबळेश्वरलाही या दिवसांत बरीच गोमंतकीय कुटूंबे गेली आहेत. सध्या मुलांच्या सुट्टीचा मोसम असल्याने व गोव्यात खूप उकाडा होत असल्याने गोमंतकीय माणूस परप्रांतात थंड हवेच्या ठिकाणी जाणो पसंत करतो. आता विमान प्रवासाचे दर पूर्वीसारखे जास्त राहिलेले नाहीत. त्यामुळे बरीच गोमंतकीय कुटूंबे सध्या विदेश वारीवरही गेली आहेत.

देश- विदेशी पर्यटकांनी अशा वेळीच गोव्यात गर्दी केली आहे. विदेशी पर्यटकांना येथील उकाडा आवडतो. मिरामार, कळंगुट, कांदोळी, सिकेरी, बागा, हणजुणो, वागातोर, आश्वे, मोरजी, मांद्रे, हरमल, कोलवा, पाळोळे अशा किना:यांवर सध्या पर्यटकांची बरीच गर्दी झालेली आहे. गेल्या पर्यटन मोसमाच्या तुलनेत यंदा पर्यटक कमी असल्याचे हॉटेल व्यवसायिक सांगतात. मात्र हॉटेलमधील खोली भाडय़ाचे दर कमी झालेले नाहीत. शहरांच्या ठिकाणी हॉटेलच्या खोल्या उपलब्ध आहेत पण किनारपट्टीत हॉटेलमध्ये खोली सध्या मिळत नाही. लाखो पर्यटक सकाळी व सायंकाळी समुद्रात स्नान करताना आढळून येत आहेत. राज्यातील रुपेरी वाळूच्या किना:यांवर दिवसभर विदेशी पर्यटक पहुडलेले पहायला मिळत आहेत. सुर्यास्त जवळ येऊ लागला की, विदेशी पर्यटक समुद्राच्या पाण्यात उतरतात.

Web Title: Goa waits for monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.