गोवा: धबधबेही ठरले जीवघेणे! आता धबधब्यांवरही नेमणार जीवरक्षक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 06:26 PM2017-10-01T18:26:18+5:302017-10-01T18:27:25+5:30

गोव्यात पर्यटकांचे आकर्षण ठरलेले धबधबेही जीवघेणे ठरले आहेत. शनिवारी साखळीनजीक हरवळे धबधब्यावर लष्करी जवानाचा बुडून मृत्यू झाला.

Goa: Waterfighters become dead! Now the defender will set up the waterfalls | गोवा: धबधबेही ठरले जीवघेणे! आता धबधब्यांवरही नेमणार जीवरक्षक 

गोवा: धबधबेही ठरले जीवघेणे! आता धबधब्यांवरही नेमणार जीवरक्षक 

Next

पणजी : गोव्यात पर्यटकांचे आकर्षण ठरलेले धबधबेही जीवघेणे ठरले आहेत. शनिवारी साखळीनजीक हरवळे धबधब्यावर लष्करी जवानाचा बुडून मृत्यू झाला. अलीकडेच दुधसागर धबधब्यावर मुलुंड, मुंबई येथील एक युवक बुडाला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील धबधब्यांवरही जीवरक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शनिवारी पणजीतील लष्करी इस्पितळातील मूळ तामिळनाडू येथील जवान पेरीस्वामी मरीमुट्टू हा हरवळे येथे बुडून मृत्यू पावला. पाण्याचा अंदाज नसल्याने गोव्यात धबधब्यांच्या ठिकाणीही पर्यटकांचे बुडून मृत्यू पावण्याचे प्रकार वाढल्याने पर्यटन खात्याने गंभीर दखल घेतली आहे. 
मंत्री बाबू आजगावकर म्हणाले. अनेकदा जीवरक्षक समुद्रात उतरु नका, असा सल्ला देत असतात परंतु मद्यधुंद पर्यटक तो धुडकावून समुद्रात उतरतात आणि आपले प्राण गमावून बसतात. 

मुंबईची दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनी गोव्याच्या किना-यांवर जीवरक्षकाचे काम करते. हे जीवरक्षक आता  केवळ किनाºयांपुरतेच मर्यादित न राहता धबधबे तसेच पाणथळ असलेल्या अन्य पर्यटनस्थळांवरही नेमले जाणार आहेत. मंत्री आजगांवकर म्हणाले की, हरवळे येथील या धबधब्यावर ही दुर्घटना घडली तेथे पाण्यात उतरण्यासारखीसारखी स्थिती नव्हती. सध्या गोव्यात विकएंडच्या सलग सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झालेली असून  किनारे, धबधबे याठिकाणी मोठी संख्या दिसून येत आहे. उत्सवाच्या निमित्ताने मिळालेल्या सलग सुट्टीचा पर्यटकांनी लाभ घेतला हे बरेच  परंतु  गोव्यात आल्यानंतर  अशा ठिकाणी स्वत:ची काळजी घेणे  महत्त्वाचे आहे, असे मंत्री आजगावकर यांनी स्पष्ट केले. 

जीवरक्षक किंवा पोलिसांनी दिलेले इशारे किंवा निर्देश पर्यटकांनी त्या त्या पर्यटनस्थळांवर पाळावयाचे आहेत, असे ते म्हणाले. गोव्यात येणाºया पर्यटकांनी चांगल्या स्मृती घेऊनच आपल्या गावात परतावे, अशी पर्यटन खात्याची सदिच्छा आहे. पर्यटकांनी येथे स्वत:ची काळजी घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.  

किना-यांवर 600 जीवरक्षक!
दृष्टि लाइफ सेविंग कंपनी किना-यांवर जीवरक्षकाचे काम करायला लागल्यापासून किना-यांवर बुडून मृत्यू पावण्याच्या घटना ९९ टक्क्यांनी घटल्याचा तसेच ३ हजारहून अधिक जीव वाचविल्याचा दावा केला जात आहे. राज्यातील ३८ किना-यांवरील तब्बल ४0 पॉइंटसवर सुमारे ६00 जीवरक्षक तैनात आहेत. ३५ टॉवर्स किना-यांवर आहेत. २00८ पासून किनाºयांवर जीवरक्षक तैनात केलेले आहेत. गत साली २0१६ मध्ये ४0५ पर्यटकांना वाचविले त्यात ३१९ देशी तर ८६ विदेशी होते. यावर्षी जुलैपर्यंत १६६ पर्यटकांना वाचविले त्यात १३0 देशी व ३६ विदेशी होते, असे सांगण्यात आले. 
 

Web Title: Goa: Waterfighters become dead! Now the defender will set up the waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.