Goa: अजूनही शांता आहोत.. दुर्गा पण बनू शकतो, ऐन नवरात्रात भोमच्या महिला कडाडल्या

By आप्पा बुवा | Published: October 22, 2023 11:24 PM2023-10-22T23:24:38+5:302023-10-22T23:25:15+5:30

Goa: सरकारने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये अशा शब्दात भोम येथील महिलांनी ऐन नवरात्र मध्ये सरकारला इशारा दिला आहे.

Goa: We are still calm.. Durga can also become, women of Bhom are fierce during Navratri | Goa: अजूनही शांता आहोत.. दुर्गा पण बनू शकतो, ऐन नवरात्रात भोमच्या महिला कडाडल्या

Goa: अजूनही शांता आहोत.. दुर्गा पण बनू शकतो, ऐन नवरात्रात भोमच्या महिला कडाडल्या

- अप्पा बुवा 
 फोंडा - सरकारने दडपशाही चालवलेली असताना सुद्धा आम्ही अजून पर्यंत शांता  बनून राहिलो आहोत. परंतु ज्या तऱ्हेने सरकार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहे ते पाहता आम्ही दुर्गा पण होऊ शकतो. सरकारने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये अशा शब्दात भोम येथील महिलांनी ऐन नवरात्र मध्ये सरकारला इशारा दिला आहे.

रविवारी संध्याकाळी नागझरकर मंदिर परिसरात भोम येथील नागरिक गोळा झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश होता . पत्रकारांची बोलताना सर्व महिलांनी कोणत्याही परिस्थितीत गाव धोक्यात घालून प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेतला. प्रसंगी तीव्र लढा देण्याची तयारी सुद्धा ठेवण्याचा मनोदय बोलून दाखवला.

संपूर्ण आंदोलनाचे निमंत्रक संजय नाईक यावेळी बोलताना म्हणाले की सरकार नक्की काय लपवत आहे हे त्यांनी स्पष्ट येऊन लोकांना सांगावे. भोम संदर्भात सरकारची विविध खाती वेगवेगळी विधाने करत आहेत. काहीजण म्हणतात दोन घरे जाणार आहेत. काहीजण म्हणतात काहीच जाणार नाही. तर काहीजण आणखी काही वक्तव्य करत आहेत. एका बाजूने सरकार म्हणते की गाव देशोधडीला लागणार नाही तर दुसऱ्या बाजूने सरकारचे अधिकारी म्हणतात की जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. यामुळे इथले लोक खवळलेले असून सरकारने नक्की काय ते लोकांना समोर येऊन सांगावे. प्रशासन जोपर्यंत लोकांची समजूत काढत नाहीत व लोक प्रकल्पाविषयी समाधानी होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहोत. हे काम कसेच होऊ देणार नाही. ह्या बाबतीत आम्ही सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. तो आणखीन आठ दिवसात संपत आहे. ह्या आठ दिवसात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिक व अधिकाऱ्यांची भेट घडवून आणावी व लोकांना व्यवस्थित काय ते समजावून सांगावे.तसेच आतापर्यंत जो लपाछपीचा खेळ चालू आहे तो अगोदर बंद करावा.

स्थानिक आमदार गोविंद गावडे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की इथल्या आमदाराला लोकांचे काहीच पडून गेलेले नाही. त्यांचीच काही माणसे सदरच्या प्रकल्पावरून सरकारला मदत करत आहेत. ते वीस लोक कोण याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. योग्य वेळ येताच त्या 20 लोकांची नावे आम्ही जाहीर करू.  त्या वीस लोकांना गावाचे काहीच पडून गेले नाही. फक्त आपला व आपल्या राजकर्त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी ते भोळ्या बावड्या ग्रामस्थांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत.

चार दिवसांपूर्वी सरकारचे अधिकारी सर्वेक्षण करायला आले होते. तो मुद्दा घेऊन  ते म्हणाले की जर काहीच लपवायचे नाही तर मग सरकारी अधिकारी अपरात्री इथे येऊन  काम का करतात . ह्या बाबतीत स्थानिक पंचायत मंडळाला सुद्धा काहीच माहिती कसे नाही. सर्वेक्षणाला गावात येण्यापूर्वी निदान पंचायत मंडळाला तरी विश्वासात घ्या. यापुढे लोकांना न सांगता गावात सर्वेक्षण करायला आल्यास लोकांच्या सहनशक्तीचा उद्रेक होऊ शकतो. परवा जर काही अनुसूचित प्रकार घडला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती. आमच्या लोकांनी त्यावेळी संयम दाखवला. परंतु प्रत्येक वेळेस शेपटीवर पाय ठेवण्याचा प्रकार झाल्यास लोकांचा तोल ढळू शकतो हे सरकारने लक्षात घ्यावे.

आगामी ग्रामसभेत या विषयावरून आम्ही पंचायत मंडळाकडून ठोस काय ते जाणून घेणार आहोत. निदान त्यावेळी तरी पंचायत मंडळांनी ते गावाबरोबर आहेत की सरकार बरोबर आहेत हे स्पष्ट करावे. पंचायत मंडळातील काही पंच गावाबरोबर आहेत हे आम्हाला माहीत आहे. परंतु काही झारीतील शुक्राचार्य मात्र गावावर नांगर फिरवू पहात आहेत.

Web Title: Goa: We are still calm.. Durga can also become, women of Bhom are fierce during Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा