Goa: आमदार निधीच्या माध्यमातून फोंड्यात लहान विकास कामांना प्राधान्य देऊ, कृषिमंत्री रवी नाईक यांचं आश्वासन
By आप्पा बुवा | Published: May 9, 2023 04:55 PM2023-05-09T16:55:33+5:302023-05-09T16:56:56+5:30
Ravi Naik: नगरपालिका क्षेत्रात कामे सुरू करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कामे पुढे नेण्यात येतील. असे आश्वासन कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिले.
- अप्पा बुवा
फोंडा - प्रत्येक आमदाराला अडीच कोटीचा जो आमदार निधी मिळत आहे त्या निधीच्या माध्यमातून मतदार संघातील लहानसहान कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नगरपालिका क्षेत्रात कामे सुरू करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कामे पुढे नेण्यात येतील. असे आश्वासन कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे दुर्गाभाट येथे नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, विद्या पुनाळेकर, अभियंते काशिनाथ सराफ,गावणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की 'आमच्या सरकार अंतर्गत येणारा पाणीपुरवठा विभाग चांगले काम करत असून गोव्यातील इतर भागाची तुलना करता फोंड्यात कुठेच पाण्याची टंचाई भासत नाही. फोंड्यात तुम्हाला कुठेही टँकर दिसणार नाही. अशी योजना आम्ही केलेली आहे.
नगरसेवक आनंद नाईक व रितेश नाईक यांनी सुद्धा यावेळी आपले विचार व्यक्त केले.