गोव्याच्या महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व शिखा पांडेकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 04:36 PM2023-12-31T16:36:28+5:302023-12-31T16:36:52+5:30

सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील लढतीसाठी गोवा क्रिकेट संघटनेने महिला क्रिकेट संघ जाहीर केला आहे.

Goa womens cricket team is headed by Shikha Pandey team announced | गोव्याच्या महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व शिखा पांडेकडे

गोव्याच्या महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व शिखा पांडेकडे

पणजी : सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील लढतीसाठी गोवा क्रिकेट संघटनेने महिला क्रिकेट संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेतील गोव्याचे लीग सामने ४ ते १६ जानेवारी या कालावधीत त्रिवेंद्रम येथे खेळविण्यात येतील. राज्याच्या गटात मेघालय, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र व राजस्थानच्या गटांचा समावेश आहे. 

राज्याचा सीनियर महिला क्रिकेट संघ असा :  शिखा पांडे (कर्णधार), पूर्वजा वेर्लेकर (उप-कर्कणधार), तरन्नूम पठाण, प्रियांका कौशल, सुनंदा येत्रेकर, पूर्वा भाईडकर, तनया नाईक, विनवी गुरव, दिक्षा गावडे, श्रेया परब, निकिता, मळीक, तेजस्विनी दुर्गद, दिव्या नाईक, संजल सातार्डेकर व दिक्षा आमोणकर.

राज्याच्या लढती याप्रमाणे : ४ जानेवारी रोजी मेघालयविरुद्ध, ६ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर विरुद्ध, ८ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशविरूद्ध, १० जानेवारी रोजी हरियाणाविरुद्ध, १४ जानेवारी रोजी महाराष्ट्र विरुद्ध, व १६ जानेवारी रोजी राजस्थान.

Web Title: Goa womens cricket team is headed by Shikha Pandey team announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा