गोवा महिला फुटबॉल महोत्सव : तिबेट संघाचा ६-०ने पराभव

By admin | Published: May 8, 2016 07:38 PM2016-05-08T19:38:18+5:302016-05-08T19:38:18+5:30

म्हापसा येथील धुळेर मैदानावर झालेल्या गोवा फुटबॉल महोत्सव स्पर्धेचे विजेतेपद गोवा इलेव्हन संघाने पटकाविले.

Goa Women's Football Festival: defeating Tibetan team 6-0 | गोवा महिला फुटबॉल महोत्सव : तिबेट संघाचा ६-०ने पराभव

गोवा महिला फुटबॉल महोत्सव : तिबेट संघाचा ६-०ने पराभव

Next

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 8- म्हापसा येथील धुळेर मैदानावर झालेल्या गोवा फुटबॉल महोत्सव स्पर्धेचे विजेतेपद गोवा इलेव्हन संघाने पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात तिबेट महिला फुटबॉल संघावर ६-० ने मात केली. गोव्याच्या सौम्या मुकुंदनने हॅटट्रिक नोंदवली. तिने २४, ३३ आणि ४६ व्या मिनिटाला गोल नोंदवले. वेलंका डिसोझाने ७व्या आणि २०व्या मिनिटाला गोल नोंदवला. तिबेटच्या टेंझिन यांगझोमने १७ व्या मिनिटाला स्वंयगोल नोंदवला. त्यामुळे गोवा इलेव्हन संघाला ६-० असा मोठा विजय नोंदवता आला.
सामन्यावर सुरुवातीपासून गोवा इलेव्हन संघाचे वर्चस्व दिसून आले. हा सामना रोमांचक होईल असे वाटत होते. मात्र गोवा इलेव्हनच्या सौम्याने तिबेट संघाला जबर धक्के दिले. सातव्या मिनिटाला वेलंकाने गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली होती. हा पास तिला सिन्ना लोबो हिने दिला होता. त्यानंतर १७ व्या मिनिटाला टेंझिनचा आत्मघाती गोल गोवा इलेव्हन संघाला २-० अशी आघाडी मिळवून देणारा ठरला. त्यानंतर वालंका डिझोझाने पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन करीत संघाचा तिसरा गोल नोंदवला. तिबेटचा बचाव भेदत तिने गोलजाळ्यात शानदार पद्धतीने चेंडू ढकलला. प्रतिस्पर्धी संघाची कर्णधार गोल नोंदवण्याचे प्रयत्न करीत होती. मात्र गोवा इलेव्हनचा बचाव भेदण्यात तिला यश आले नाही. त्यानंतर सौम्या हिने खेळाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. तिने २४, ३३ व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. तिच्या या आघाडीमुळे गोवा इलेव्हन संघात जोश भरला होता. अखेर सौम्याने स्वत:चा तिसरा गोल नोंदवत हा विजय पक्का केला. बक्षीस वितरण समारंभास म्हापसा पालिका उपाध्यक्ष मर्लिन डिसोझा, गोवा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष लाविनो रिबेलो, ज्युलियानाकुलासो, पीटर वाल्स, राहुल रॉड्रिग्स आदी मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Goa Women's Football Festival: defeating Tibetan team 6-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.