गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 10:02 AM2023-08-24T10:02:43+5:302023-08-24T10:04:11+5:30

प्रक्षेपण पाहण्यासाठी मंत्रीही उपस्थित.

goa young scientists should also be part of campaigns like chandrayaan said cm pramod sawant | गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः गोव्यातील युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांमध्ये भाग घ्यावा असे म्हणत चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेसाठी इस्त्रोचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले. गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनी चंद्रयानसारख्या मोहीमांचा भाग व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, चंद्रयान मोहीम 3 मध्ये गोव्याची पिळर्ण ओद्यौगिक वसाहत येथील कायनेको ही उत्पादन कंपनी सहभागी झाली होती. मोहीमेसाठी लागणारी उपकरणे तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. उत्पादन क्षेत्राप्रमाणे गोव्यातील वैज्ञानिकांनीही भविष्यात होणाऱ्या अशा मोहीमांमध्ये भाग घ्यावा. विद्यार्थ्यांना या क्षेत्रात तयार करण्यासाठी अनेक संशोधन संस्था आहेत. याशिवाय मनोहर पर्रीकर शिष्यवृती योजनाही युवा वैज्ञानिकांसाठी आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

पणजी येथील मॅकेनिझ पॅलेस येथे चंद्रयान मोहीम ३ चे थेट प्रक्षेपण खास विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डॉ. दिव्या राणे, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरासह मंत्री व आमदार उपस्थित होते.

चंद्रावर भारत!

पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीने स्थापन केलेल्या इस्त्रोने भारताला चांद्रयान- ३ वरून चंद्रावर नेले. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १९६२ मध्ये अवकाश संशोधनाची गरज ओळखून भारतीय अंतराळ संशोधन समिती स्थापन केली. सदर वैज्ञानिक संस्थेचे १९६९ मध्ये इस्त्रो असे नामकरण करण्यात आले. भारताचे अभिनंदन! - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

 

Web Title: goa young scientists should also be part of campaigns like chandrayaan said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.