लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणे हेच लक्ष्य; भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 11:47 AM2023-06-04T11:47:27+5:302023-06-04T11:48:18+5:30

केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून असे उपक्रम राबविले जात नसून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

goal is to win both lok sabha seats bjp state president sadanand tanavade | लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणे हेच लक्ष्य; भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे

लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणे हेच लक्ष्य; भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : भाजप सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात नऊ वर्षे सरकार कार्यरत आहे. तर गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीही सरकार आणि त्यांची कार्यपद्धत आतापर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती ज्येष्ठ भाजपच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावी, यासाठी 'संपर्क ते समर्थन' उपक्रमांतर्गत राज्यात ही मोहीम राबवली जात आहे.

केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून असे उपक्रम राबविले जात नसून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यंदाची लोकसभा पूर्णपणे दोन्ही जागा जिंकण्याचा संकल्प केल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले.

कोरगाव येथील सोनू तळवणेकर यांच्या निवासस्थानी आमदार प्रवीण आर्लेकर, तोरसेचे माजी सरपंच सूर्यकांत, भाजप सरचिटणीस उषा नागवेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ देसाई, कोरगावच्या माजी सरपंच स्वाती गवंडी, सचिव देवानंद गावडे, वजरी पंच कार्तिक नाईक आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामाची पुस्तिका घरोघरी वितरित करून भाजप समर्थकांशीही चर्चा केली. लोकसभेच्या निवडणुकीला इच्छुक आहात का? असा प्रश्न विचारला असता तानावडे म्हणाले, सध्या निवडणुकीपेक्षा दोन्ही लोकसभेच्या जागा जिंकून केंद्रात भाजप सरकार अस्तित्वात आणणे हा आमचा संकल्प आहे. लोकसभेसाठी कोण उमेदवार असेल हे केंद्रीय समिती ठरवणार आहे, असे तानावडे यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: goal is to win both lok sabha seats bjp state president sadanand tanavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.