गोव्याचा डावखुरा टेबल-टेनिसपटू वेस्ली राेझारीयो जागतीक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात दाखल
By समीर नाईक | Published: July 29, 2023 06:42 PM2023-07-29T18:42:53+5:302023-07-29T18:43:15+5:30
वेस्ली सध्या चीन येथे स्पर्धेठिकाणी संघासोबत दाखल झाला आहे.
समीर नाईक, पणजी: गोव्याच्या युवा डावखुरा टेबल-टेनिसपटू वेस्ली राेझारीयो याचा चीन येथे सुरु असलेल्या जागतीक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघात निवड झाली आहे. वेस्ली सध्या चंदीगढ येथील चित्कारा विद्यापीठातून बीबीएचे शिक्षण घेत आहे. टेबल-टेनिसचे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण मिळावे यासाठी वेस्लीने या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. चीन येथील चेंगडू येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ दरम्यान एफआयएसयू जागतीक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेस्ली रोझारीयो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे, ही राज्यासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. वेस्ली सध्या चीन येथे स्पर्धेठिकाणी संघासोबत दाखल झाला आहे.
मूळ मडगाव येथील २१ वर्षीय वेसली रोझारियो सध्या देशाच्या स्टार खेळाडूंच्या यादीत पोहचला आहे. वेसली याने वयाच्या चौथ्या वर्षापासून टेबलटेनिस खेळायला सुरुवात केली. या काळात प्रशिक्षक दीपक मळीक यांनी त्याला मार्गदर्शन केले. गेली १६ वर्षे वेस्ली टेबलटेनिस खेळत आहे. वेस्लीने २०१२ मध्ये राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत सुवर्ण पदक, २०१६ मध्ये इंडियन ओपन चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदक, याचवर्षी राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत कांस्य पदक, तर खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदक, २०१९ मध्ये २१ वर्षाखालील गटात राष्ट्रीय मानांकनामध्ये कांस्य पदक, व खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुहेरी गटात रौप्य पदक प्राप्त केले आहे.