गोव्याच्या आमदारांना आता वेतनापोटी अतिरिक्त ७७ हजार रुपयांचा लाभ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 05:24 AM2018-09-23T05:24:08+5:302018-09-23T05:24:22+5:30

राज्यातील सर्व आमदारांना दर महिन्याला वेतन व भत्ते मिळून सरासरी १ लाख रुपये सरकारकडून मिळत होते. त्यात आता ७७ हजार रुपयांची अतिरिक्त भर पडली आहे. अर्थ खात्याकडे फाईल पाठविली आहे.

 Goan MLAs now get an extra bonus of Rs 77,000 from salary | गोव्याच्या आमदारांना आता वेतनापोटी अतिरिक्त ७७ हजार रुपयांचा लाभ मिळणार

गोव्याच्या आमदारांना आता वेतनापोटी अतिरिक्त ७७ हजार रुपयांचा लाभ मिळणार

Next

पणजी - राज्यातील सर्व आमदारांना दर महिन्याला वेतन व भत्ते मिळून सरासरी १ लाख रुपये सरकारकडून मिळत होते. त्यात आता ७७ हजार रुपयांची अतिरिक्त भर पडली आहे. अर्थ खात्याकडे फाईल पाठविली आहे.
ज्यांनी बंगला घेतला नाही, त्यांना पूर्ण रक्कम मिळते. आमदारांना मतदारसंघ भत्ता व वेतन मिळून १ लाखाची जी रक्कम आतापर्यंत मिळत आली, त्यात आता नव्या वाढीमुळे ७७ हजार रुपयांची भर पडत असल्याने प्रत्येक आमदाराला १ लाख ७७ हजार रुपये मिळतील. एप्रिलपासून आमदारांना थकबाकी मिळणार आहे.
माजी आमदारांना निवृत्तीवेतनाच ७७ टक्के वाढ मिळाली आहे पण त्यांना कुणालाच ७० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देता येणार नाही. कारण माजी आमदाराचे निवृत्ती वेतन हे ७० हजार रुपयांपेक्षा जास्त होऊ नये असा नियम सरकारने केलेला आहे.

राजकीय पेच कायम
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वत:कडील अतिरिक्त खात्यांचे वाटप करतच नाहीत, याची जाणीव सर्व मंत्र्यांना झाली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राजस्थानमध्ये व्यस्त राहिल्याने ते दिल्लीतील एम्स इस्पितळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊ शकले नाहीत.

Web Title:  Goan MLAs now get an extra bonus of Rs 77,000 from salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.