फेब्रुवारीपासून कॅसिनोंमध्ये जाण्यास गोमंतकीयांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 02:40 PM2020-01-30T14:40:36+5:302020-01-30T14:40:58+5:30

राज्यातील मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंमध्ये जाण्यास येत्या दि. 1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना बंदी असेल.

Goa's citizen banned from entering casinos since February | फेब्रुवारीपासून कॅसिनोंमध्ये जाण्यास गोमंतकीयांना बंदी

फेब्रुवारीपासून कॅसिनोंमध्ये जाण्यास गोमंतकीयांना बंदी

Next

पणजी - राज्यातील मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंमध्ये जाण्यास येत्या दि. 1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना बंदी असेल. सरकारने गेमिंग कमिशन स्थापन करण्याचे ठरवले आहे. त्याविषयीची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे.

मांडवी नदीत पाच कॅसिनो आहेत. जहाजांमधील कॅसिनोंमध्ये देश- विदेशातील पर्यटक जातात व कॅसिनो जुगार खेळतात. त्याचबरोबर हजारो गोमंतकीयांनाही कॅसिनोचे व्यसन लागले आहे. अनेक गोमंतकीय कुटूंबेही कॅसिनोमुळे उध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यास बंदी लागू करावी अशी मागणी आमदार व काही मंत्र्यांकडून सातत्याने केली जात होते. कळंगुट मतदारसंघाचे आमदार तथा बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यास बंदी लागू करायला हवी अशी मागणी लोबो यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. गोवा विधानसभेतही 2019 साली याविषयी आश्वासन दिले गेले होते पण त्याची पूर्तता कधी झाली नव्हती. कॅसिनोंवर रोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. मांडवी नदीतून कॅसिनो हटविले जावेत अशी मागणीही काही आमदार करत आहेत. मात्र सरकार तूर्त गोमंतकीयांना बंदी लागू करण्याच्याच विषयावर लक्ष देईल, असे सुत्रंनी सांगितले.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी अधिकृत घोषणा केली. गोव्याचे वाणिज्य कर आयुक्त हेच गेमिंग कमिशनर म्हणून काम पाहतील. आपण त्याविषयीच्या फाईलवर प्रक्रिया सुरू केली आहे. गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यापासून बंदी लागू होईल. दि. 1 फेब्रुवारीपासून बंदीची अंमलबजावणी गेमिंग कमिशनर करून घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कॅसिनोंमध्ये जे कुणी जातील त्यांचे ओळखपत्र मागण्याचा अधिकार हा गेमिंग कमिशनरला असेल असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Web Title: Goa's citizen banned from entering casinos since February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.