गोव्याचा बंगालवर विजय
By admin | Published: July 1, 2016 08:36 PM2016-07-01T20:36:28+5:302016-07-01T20:36:28+5:30
क्रिश्मा शिरवईकरच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर गोव्याच्या महिला ज्युनिअर संघाने पश्चिम बंगालचा ३-१ ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी कटक (ओडिशा) येथे सुरु असलेल्या
राष्ट्रीय ज्युनिअर महिला फुटबॉल :क्रिश्माची हॅट्ट्रिक, ३-१ ने मात
पणजी : क्रिश्मा शिरवईकरच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर गोव्याच्या महिला ज्युनिअर संघाने पश्चिम बंगालचा ३-१ ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी कटक (ओडिशा) येथे सुरु असलेल्या ज्युनिअर महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली आहे. ही स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयोजित केली आहे.
कटक येथील बारबती स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गोव्याच्या महिला संघाने आक्रमक सुरुवात केली होती. प्रशिक्षक ज्युलियट मिरांडा यांनी संघाची आखणी ४-४-२ अशा पद्धतीने केली होती. आघाडीपटू क्रिश्मा शिरवईकर आणि सुश्मिता जाधव यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. अविया जीन आणि वेलिना फर्नांडिस यांनी मिडफिल्डवर सफाईदारपणे काम केले. गोव्याने बंगालवर दबाव निर्माण केला होता. याच संधीचा फायदा उठवत ३२ व्या मिनिटाला संधी प्राप्त केली. त्यानंतर ४० व्या मिनिटाला क्रिश्माने अॅनलीकडून आलेल्या पासवर गोल नोंदवला आणि आघाडी २-० वर नेली. लेमन ब्रेकनंतर पश्चिम बंगालने चेंडूवर अधिक वर्चस्व मिळवले होते. मात्र, गोव्याचा तितकाच आक्रमकपणा कायम होता. ८३ व्या मिनिटाला वेलीना हिने क्रिश्माकडे चेंडू पास केला. यावर कोणतीही चूक न करता क्रिश्माने आपली हॅट्ट्रिक साधणारा गोल नोंदवला. या गोलमुळे गोव्याने ३-१ असे विजयावर शिक्कामोर्तब केले. आता गोव्याचा पुढील सामना केरळविरुद्ध ५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता होईल.