गोव्याच्या वीज मंत्र्यांना ब्रेन स्ट्रोक, कोकिलाबेनमध्ये उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:31 AM2018-06-05T11:31:15+5:302018-06-05T11:31:15+5:30
पणजी : गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना सोमवारी रात्री उशिरा मुंबई येथे ब्रेन स्ट्रोक आला. मंगळवारी सकाळी मुंबईतील कोकीळाबेन इस्पितळात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी मंगळवारी भाजपच्या पणजीतील मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी जाहीर केले. यावेळी भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांनी अमेरिकेहून मंत्री मडकईकर यांना काल सायंकाळी पाचच्या सुमारास फोन केला होता. मडकईकर त्यावेळी मुंबईत होते. मडकईकर सोमवारी दुपारी मुंबईला गेले होते. तिथून ते मंगळवारी दिल्लीला जाणो अपेक्षित होते. गोव्यात सध्या वीज समस्येने कहर केलेला आहे व लोकांकडून वीज खात्यावर बरीच टीका होत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेहून सोमवारी सायंकाळी फोन करून मडकईकर यांना वीज खात्याच्या अभियंत्यांची बैठक घेण्याची सूचना केली होती. मडकईकर यांनी बुधवारी अभियंत्यांची आपण बैठक बोलवत असल्याचे मुंबईहून लोकमतला सांगितले होते. तोर्पयत मडकईकर यांची प्रकृती ठीक होती. मडकईकर यांना रात्री अस्वस्थ वाटू लागले. मडकईकर ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या हॉटेलला त्यांनी रात्री बाराच्या सुमारास कळविले. आपल्याला बरे वाटत नसल्याची कल्पना त्यांनी हॉटेलमधील कर्मचा:यांना देताच हॉटेलच्याच वाहनाने त्यांना मुंबईच्या कोकीळाबेन इस्पितळात नेण्यात आले. तिथे त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचे स्पष्ट झाले व सकाळी त्यांच्यावर श क्रिया पार पडली.
दरम्यान, आरोग्य मंत्री राणो यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा राणो म्हणाले की आपण स्वत: व गोवा सरकारच्या गोमेकॉ इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक मंगळवारी मुंबईतील इस्पितळात जात आहोत. आम्ही मडकईकर यांची भेट घेऊ. मडकईकर यांच्यावरील श क्रिया यशस्वी झाल्याचे मुंबईच्या इस्पितळातील डॉक्टरांनी मला सांगितले आहे. मडकईकर हे निश्चितच बरे होऊन येतील. गोव्यात वीज समस्येबाबत रविवारी जे काही घडले त्याबाबत आम्ही दिलगिर आहोत. पुन्हा असे काही घडणार नाही. मुख्यमंत्री र्पीकर यांनी अमेरिकेहून गोव्यातील वीज समस्येवर आता देखरेख ठेवली आहे.