नोव्हेंबर अखेर गोव्याचे उर्जा धोरण होणार निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 07:08 PM2018-10-30T19:08:34+5:302018-10-30T19:09:15+5:30
स्वत:चा वीज उत्पादनाचा कुठलाही स्रोत नसलेल्या गोव्यासाठी सौर उर्जा हा सक्षम पर्याय होऊ शकेल का? वीज खाते आणि गोवा सौर उर्जा महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून या पर्यायावर विचार चालू असून, या नोव्हेंबरअखेर गोवा राज्यासाठी जे उर्जा धोरण तयार करण्यात येणार आहे.
मडगाव - स्वत:चा वीज उत्पादनाचा कुठलाही स्रोत नसलेल्या गोव्यासाठी सौर उर्जा हा सक्षम पर्याय होऊ शकेल का? वीज खाते आणि गोवा सौर उर्जा महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून या पर्यायावर विचार चालू असून, या नोव्हेंबरअखेर गोवा राज्यासाठी जे उर्जा धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यात या पर्यायावर भर दिला जाणार आहे.
मंगळवारी वीज नियमन आयोगाची मडगावात जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्यावेळी ही माहिती देण्यात आली. गोव्यात 410 किलो वॅटचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे अशीही माहिती यावेळी देण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष एम. के. गोयल व सदस्य निरजा माथूर यांनी ग्राहकांचे म्हणणो ऐकून घेतले. यावेळी गोवा राज्याचे प्रमूख वीज अभियंते एन. एम. रेड्डी हेही उपस्थित होते.
यावेळी कित्येक ग्राहकांनी गोव्यातील खराब वीज पुरवठय़ाबद्दल गा-हाणी मांडली. गोव्याच्या वीज खात्याने जी सामग्री विकत घेतली आहे ती हलक्या दर्जाची असल्याने या समस्या उद्भवतात. यापुढे वीज खात्याने दर्जेदार सामग्रीचा वापर करावा असे यावेळी सांगण्यात आले. वीज खात्याच्या कर्मचा-यांकडून ग्राहकांना योग्यतरेची वागणूक मिळत नाही त्यामुळे या कर्मचा:यांना ग्राहकांशी कसे वागावे याबद्दलचे प्रशिक्षण द्यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.