आरोग्याविषयी गोवा चौथ्या क्रमांकावर, निती आयोगाचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 07:56 PM2019-06-25T19:56:03+5:302019-06-25T19:56:08+5:30
पणजी : देशातील छोटय़ा राज्यांमध्ये आरोग्य सेवेच्याबाबतीत गोवा राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाने तसा अहवाल दिला ...
पणजी : देशातील छोटय़ा राज्यांमध्ये आरोग्य सेवेच्याबाबतीत गोवा राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाने तसा अहवाल दिला असल्याचे मंगळवारी जाहीर झाले. केरळ राज्याचा क्रमांक पहिला लागला आहे.
छोटय़ा आठ राज्यांमध्ये मिझोराम हे आरोग्य सेवेच्या निकषांवर पहिले राज्य ठरले. मोठय़ा एकवीस राज्यांमध्ये केरळनंतर आंध्र प्रदेश हे आरोग्य सेवेबाबत उत्कृष्ट ठरले. आंध्रचा क्रमांक दुसरा लागला. उत्तर प्रदेशची कामगिरी मात्र एकदम खराब ठरली आहे. तशी नोंद नीती आयोगाने केली आहे. महाराष्ट्राला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. गोव्यात हृदयरोगविषयक उपचारांची व्यवस्था आहे. मात्र गोव्यात अजून एखादे तरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे रोज चोवीस तास सुरू रहायला हवे, असे नीती आयोगाने म्हटले आहे. जन्माची नोंद होण्याचे प्रमाण गोव्यात 2क्14 साली 1क्क् टक्के होते. 2क्16 साली हे प्रमाण 84.4 टक्क्यांर्पयत खाली आले.
दरम्यान, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांच्याकडेच उद्योग खातेही आहे. राणो यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. उद्योग क्षेत्रत गोव्यात काय करू शकेल याविषयी राणो यांनी चर्चा केली व केंद्रीय वाणिज्य मंत्रलयाच्या सहकार्यानेच पुढील कामे केली जातील असे स्पष्ट केले. गोव्याच्या उद्योग क्षेत्रला केंद्रीभूत अशी धोरणो आखण्याबाबत गोयल यांचे सहकार्य घेतले जाईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग क्षेत्रत गोव्याला आक्रमक बनविले जाईल, असे मंत्री राणो म्हणाले. गृह मंत्री अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचीही त्यांनी भेट घेतली.