गोव्याच्या गाविन अरावजोने पूर्ण केला एएफसी प्रशिक्षकचा अभ्यासक्रम
By समीर नाईक | Published: July 29, 2023 05:48 PM2023-07-29T17:48:52+5:302023-07-29T17:49:39+5:30
पणजी: ताळगाव येथील गाविन अरावजो यांनी नुकतीच आशियाई फुटबॉल महासंघाचा (एएफसी) प्रशिक्षकचा प्रो डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शेवटचे ...
पणजी: ताळगाव येथील गाविन अरावजो यांनी नुकतीच आशियाई फुटबॉल महासंघाचा (एएफसी) प्रशिक्षकचा प्रो डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शेवटचे मॉड्यूल जपानमध्ये १० दिवसांसाठी आयोजित करण्यात आले होते. एकूण १४ उमेदवारांनी सदर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.सदर अभ्यासक्रम फिफा प्रशिक्षक शिक्षक किम पॉल्सन यांनी आयोजित केला होता.
पाच मॉड्यूल अभ्यासक्रम मे २०२२ मध्ये सुरू झाला आणि जूनमध्ये पाचव्या मॉड्यूलसह समाप्त झाला. गाविन अरावजो यांच्यासोबत रेनेडी सिंग, इश्फाक अहमद, विवेक नगुल, जेडी आल्मेदा, शक्ती चौहान, सुरिंदर सिंग, अँथनी अँड्र्यूज, मेहराजूद्दीन वाडू, रिचर्ड हूड, प्रद्युम रेड्डी, नोएल विल्सन, व्यंकटेश शानमुगम, व संजय सेन यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
गाविनने २००९ मध्ये आपल्या प्रशिक्षण कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी राज्यातील प्रसिध्द वास्को फुटबॉल क्लब, धेंपो फुटबॉल क्लबला प्रशिक्षण दिले आहे. सध्या ते एफसी गोवाच्या प्रशिक्षक वर्गाच्या ताफ्यात कार्यरत आहे. गाविन हा एएफसी फिटनेस कोचिंग सर्टिफिकेट लेव्हल १ प्रशिक्षक देखील आहे, गेल्या ऑक्टोबरमध्ये याबातचा अभ्यासक्रम पूर्ण करत फीटनेस प्रशिक्षक होण्याची पात्रता प्राप्त केली होती.