डॅनियलीसाठी गोवा शेवटचे ‘अ‍ॅडव्हेंचर’

By admin | Published: March 17, 2017 03:13 AM2017-03-17T03:13:20+5:302017-03-17T03:13:20+5:30

फेब्रुवारीच्या २२ तारखेला लिव्हरपूलहून भारताच्या दौऱ्यावर निघालेल्या ‘बॅगपॅकर’ डॅनियली मेक्लॉगलिनने आपल्या फेसबुक पेजवर शेवटची पोस्ट टाकली.

Goa's last 'adventure' for Daniel | डॅनियलीसाठी गोवा शेवटचे ‘अ‍ॅडव्हेंचर’

डॅनियलीसाठी गोवा शेवटचे ‘अ‍ॅडव्हेंचर’

Next

सुशांत कुंकळयेकर, काणकोण
फेब्रुवारीच्या २२ तारखेला लिव्हरपूलहून भारताच्या दौऱ्यावर निघालेल्या ‘बॅगपॅकर’ डॅनियली मेक्लॉगलिनने आपल्या फेसबुक पेजवर शेवटची पोस्ट टाकली. त्यावेळी तिला कदाचित माहितीही नसेल, तिचे हे आयुष्यातील शेवटचे ‘अ‍ॅडव्हेंचर’ असू शकेल. ती भारत दौऱ्यावर जाताना तिच्या घरच्यांनीही तिला हसतमुखाने निरोप दिला होता; मात्र अवघ्या २0 दिवसांनी गोव्यात तिचा खून झाल्याची बातमी तिच्या घरच्यांना मिळाली. ही बातमी तिची आई अँड्रिया ब्रांगेरिया हिच्यासाठी अविश्वसनीय होती.
डॅनियली मेक्लॉगलिन या २८ वर्षीय आयरिश युवतीच्या खून प्रकरणामुळे केवळ गोवाच नव्हे, तर ब्रिटनही हादरुन गेले आहे. ज्याच्यावर डॅनियलीने मित्र म्हणून विश्वास टाकला, त्या विकट भगतनेच बलात्कार करुन गळा आवळून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी भगतवर बलात्कारासह खुनाचा गुन्हाही दाखल केला आहे. मयत डॅनियलीच्या मोबाईल व नोटपॅडसह ज्या वस्तू गायब झाल्या आहेत, त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
डॅनियली गेल्या वर्षी काणकोणात आली होती. त्यावेळीच तिची विकटशी मैत्री जमली होती. फेसबुक व इतर माध्यमांतून त्यांचा वर्षभर संपर्क चालूच होता. १२ मार्च रोजी होळीचा आनंद लुटण्यासाठी एका ब्रिटिश मैत्रिणीबरोबर ती काणकोण येथे आली. दुसऱ्या दिवशी दुपारपासून ती विकटबरोबरच होती. त्यांचे मद्यपान चालूच होते. दुपार ते रात्रीपर्यंत त्यांनी किमान चार जागा बदलल्या. रात्री नऊच्या सुमारास विकट व डॅनियली ओवरे-काणकोण येथील ग्रीनपार्क शॅकजवळ दिसले. त्यानंतर विकट तिला राजबाग येथील त्या सुनसान जागेत घेऊन गेला असावा. त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच तिने प्रतिकार केला. डॅनियली पोलिसात तक्रार देईल, या भीतीनेच विकटने तिचा खून केला असावा, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत.

Web Title: Goa's last 'adventure' for Daniel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.