गोव्याच्या नेतृत्वाचा तिढा कायम; दोन घटकपक्ष उपमुख्यमंत्रीपदासाठी अडून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:11 PM2019-03-18T17:11:35+5:302019-03-18T17:12:06+5:30

मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाला भाजपप्रणीत आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी अजुनही मान्यता दिलेली नाही.

Goa's leadership talks continues; Two parties wants Deputy Chief Minister | गोव्याच्या नेतृत्वाचा तिढा कायम; दोन घटकपक्ष उपमुख्यमंत्रीपदासाठी अडून

गोव्याच्या नेतृत्वाचा तिढा कायम; दोन घटकपक्ष उपमुख्यमंत्रीपदासाठी अडून

googlenewsNext

पणजी : मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाला भाजपप्रणीत आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी अजुनही मान्यता दिलेली नाही. यामुळे गोव्यात नेतृत्वाचा तिढा सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुटू शकला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व भाजपच्या कोअर टीमने खूप प्रयत्न केले तरी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड हे दोन्ही पक्ष अजून आपल्या अटींवर अडून बसले आहेत. दोन्ही पक्षाचे नेते दोन उपमुख्यमंत्रीपदे मागत आहेत. 


भाजपमध्ये अगोदर मुख्यमंत्रीपदासाठी साखळीचे आमदार प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजित राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यात स्पर्धा होती. राणे व तेंडुलकर यांचे नाव मागे पडले व भाजपच्या संघटन मंत्र्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रमोद सावंत यांच्याकडेच भाजपचे व सरकारचे नेतृत्व सोपवावे असे ठरविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याविषयी मगो पक्षाचे प्रमुख नेते सुदिन ढवळीकर व फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा केली पण ढवळीकर व सरदेसाई यांनी आपल्याला उपमुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. गोव्यासारख्या छोटय़ा राज्यात दोन पक्षांना उपमुख्यमंत्रीपदे कशी काय देता येतील, असा प्रश्न भाजपला पडला आहे. 


रविवारी रात्री दीड वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाजपमध्ये बराच खल झाला. गडकरी व सुदिन ढवळीकर यांच्यात तर दोन बैठका झाल्या. दोन घटक पक्ष व अपक्ष मिळून एकूण नऊ बिगरभाजप आमदार आहेत. या नऊ आमदारांच्या मागण्या व अटी भाजपला मान्य झालेल्या नाहीत. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण प्रमोद सावंत यांच्या नावाला मान्यता देऊ शकत नाही, अशी भूमिका घटक पक्षांनी घेतली.


गोवा भाजपकडे स्वत:चे फक्त बारा आमदार आहेत. विरोधी काँग्रेस पक्षाकडे चौदा आमदार आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे. भाजपचे बारा व आघाडीच्या घटक पक्षांचे नऊ संख्याबळ जमेला धरले तर भाजपप्रणीत आघाडीचे संख्याबळ हे एकवीस होईल. 

Web Title: Goa's leadership talks continues; Two parties wants Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.