गोव्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांचाही कल व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 12:52 PM2017-10-08T12:52:54+5:302017-10-08T12:53:12+5:30
गोव्यात अभियांत्रिकी, फार्मसी, पॅरामेडिकल, नर्सिंग आदी व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कानोसा घेतला असता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही कल आता या अभ्यासक्रमांकडे असल्याचे दिसून येत आहे.
पणजी : गोव्यात अभियांत्रिकी, फार्मसी, पॅरामेडिकल, नर्सिंग आदी व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कानोसा घेतला असता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही कल आता या अभ्यासक्रमांकडे असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या मेमध्ये झालेल्या जीसीईटी परीक्षेला ५११२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले त्यातील तब्बल ३३ टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थी होते. तांत्रिकी शिक्षण संचालनालयाचे उपसिंचालक प्रदीप कुस्नूर या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पुढे येत आहेत आणि यातून स्पर्धाही वाढत चालली आहे. गेल्या काही वर्षात ग्रामीण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने पाच ठिकाणी परीक्षा केंद्रे सुरु करावी लागली. दोन वर्षांपूर्वी साखळी नवे परीक्षा केंद्र उघडावे लागले. त्या आधी कुंकळ्ळी, धारबांदोडा, कुडचडें, डिचोली येथेही केंद्रे उघडली. एकू ण १५ केंद्रांपैकी ५ केंद्रे ग्रामीण भागात आहेत. सत्तरीसारख्या ग्रामीण भागातूनही विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कल दिसून येतो. २0१५ साली साखळी येथे सरकारी हायरसेकंडरीमध्ये तांत्रिकी शिक्षण संचालनालयाने केंद्र उघडले तेव्हा पहिल्याच वर्षी या केंद्रात ७९ विद्यार्थ्यांनी जीसीईटी परीक्षा दिली.
वैद्यकीय प्रवेश आता ‘नीट’ परीक्षेच्या आधारावर दिला जातो त्यामुळे गोमेकॉतील एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशाचा विषय आता तांत्रिकी शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येत नाही.