केंद्राच्या स्टॅण्ड अप योजनेचा गोव्यात फज्जा!, उत्तर गोव्यात ३१५ राष्ट्रीयकृत बँका, मात्र लाभ केवळ सातजणांना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 10:45 PM2017-10-26T22:45:51+5:302017-10-26T22:46:03+5:30

केंद्राच्या स्टॅण्ड अप योजनेचा गोव्यात फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर गोव्यात तब्बल ३१५ राष्ट्रीयकृत बँका आहेत मात्र या योजनेचा मोठा गाजावाजा करुनही गेल्या तीन महिन्यात केवळ सातजणांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. 

Goa's stand-up scheme is in Goa, 315 nationalized banks in North Goa, but only seven people benefit | केंद्राच्या स्टॅण्ड अप योजनेचा गोव्यात फज्जा!, उत्तर गोव्यात ३१५ राष्ट्रीयकृत बँका, मात्र लाभ केवळ सातजणांना

केंद्राच्या स्टॅण्ड अप योजनेचा गोव्यात फज्जा!, उत्तर गोव्यात ३१५ राष्ट्रीयकृत बँका, मात्र लाभ केवळ सातजणांना

Next

पणजी : केंद्राच्या स्टॅण्ड अप योजनेचा गोव्यात फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर गोव्यात तब्बल ३१५ राष्ट्रीयकृत बँका आहेत मात्र या योजनेचा मोठा गाजावाजा करुनही गेल्या तीन महिन्यात केवळ सातजणांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. 

उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी नुकत्याच झालेल्या लीड बॅकेच्या जिल्हास्तरीय आढावा समिती तसेच सल्लागार समितीच्या त्रैमासिक बैठकीत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गोव्यात पर्यटनपूरक व्यवसायाला मोठा वाव आहे त्यामुळे खाद्यान्न प्रक्रि या, मच्छिमारी आणि विशेष करुन फणसाच्या पदार्थांवरील प्रक्रिया आदी उद्योगांना तसेच किनाºयांवरील जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स) इत्यादी प्रकल्पांचा विचार करून या उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करण्यालोकांपर्यंत या योजना पोचवाव्यात असे आवाहन नाईक यांनी केले. 

स्टॅण्ड अप इंडियाला पुढे नेण्यासाठी सर्व बँकांचा पाठिंबा महत्वाचा आहे. केंद्र सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याची फार मोठी जबाबदारी बँकांची असते असे नाईक म्हणाले. किमान एक तरी स्टँड - अप कर्ज योजना प्रत्येक बँकेने लोकांना द्यावी, असे निर्देश देऊन एप्रिल ते जून या तीन महिन्यात फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. उत्तर गोव्यात ३१५ विविध राष्ट्रीयकृत बँका असूनही या तीन महिन्यात केवळ सात लोकांनाच योजनांचा लाभ मिळणे म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे, अशी नाराजी त्यानी व्यक्त केली. 

औद्योगिक, शेतकी आणि सेवा क्षेत्रांमधील उद्योगांना युद्ध पातळीवर कर्ज योजना राबवायची गरज असल्याचे आयुषमंत्र्यांनी सांगितले. ३१ आॅगस्टपर्यंतच्या आलेल्या अहवालानुसार एकू ण स्थानिक उत्पन्न (जीडीपी) ६ टक्क्यांहून खाली आला आहे. त्यामुळे आर्थिक वाढ होण्यासाठी सरकार, बँका व अन्य एजन्सीनी एकत्रिपणे पावले उचलून लोकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज देऊन हा स्तर वाढवण्याची गरज असल्याचे आयुषमंत्री नाईक पुढे म्हणाले. 

बैठकीचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास एस. एन. गावणेकर यांनीही शैक्षणिक कर्जांवर बँकांनी भर देण्यावर जोर दिला.  यावेळी व्यासपीठावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक क्येरी मास्कारेन्हस, स्टेट बँकेचे साहाय्यक सरव्यवस्थापक शैलेश कुमार सिन्हा, नाबार्डचे व्यवस्थापक पी. वी. श्रीनिवास आणि उत्तर गोवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. अंकिता नावेलकर उपस्थित होत्या. उत्तर गोवा लीड व्यवस्थापक अशोक काणेकर यांनी बैठकीच्या शेवटी आभार व्यक्त केले. 

Web Title: Goa's stand-up scheme is in Goa, 315 nationalized banks in North Goa, but only seven people benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा