दाबोळी विमानतळावर १८ लाख रुपयांचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 07:55 PM2019-03-06T19:55:24+5:302019-03-06T19:55:44+5:30

दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर इंडिया’ विमानाच्या (एआय ९९४) प्रवाशांची येथे तपासणी करण्यात येत असताना कस्टम अधिका-यांना एका प्रवाशावर संशय आला.

Gold worth 18 lakh rupees in Dabolia airport confiscated | दाबोळी विमानतळावर १८ लाख रुपयांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर १८ लाख रुपयांचे सोने जप्त

Next

वास्को: दुबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांना आढळून येताच त्याची येथे झडती घेतली असता त्यांने आपल्या ‘जींन्स पेंन्ट’ ला कमरेला बांधून आणलेले ५९० ग्राम तस्करीचे सोने आढळले. हे सोने त्या प्रवाशाने ‘पेस्ट’ पद्धतीने लपवून आणल्याचे तपासणीच्या वेळी उघड झाले असून याबाबत कारवाई करून कस्टम अधिकाऱ्यांनी सदर सोने जप्त केले.

दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार सदर कारवाई आज (दि.६) करण्यात आली. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर इंडिया’ विमानाच्या (एआय ९९४) प्रवाशांची येथे तपासणी करण्यात येत असताना कस्टम अधिका-यांना एका प्रवाशावर संशय आला. यावेळी त्याला बाजूत घेऊन त्याची झडती घेतली असता त्यांने आपल्या ‘जींन्स पेंन्ट’ वर कमरेच्या भागात पाकीटात काहीतरी चिकटवून आणल्याचे अधिका-यांच्या उघडकीस आले. अधिका-यांनी त्वरित हे पाकीट उघडले असता यात ‘पेस्ट’ पद्धतीने तस्करीचे सोने लपवून आणल्याचे स्पष्ट होताच हे सोने कस्टम कायद्याखाली जप्त केले.

जप्त करण्यात आलेले सदर सोने ५९० ग्राम वजनाचे असल्याची माहिती कस्टम अधिका-यांनी देऊन भारतीय बाजारात याची रक्कम १८ लाख ९ हजार ६८४ रुपये असल्याची माहीती त्यांनी दिली. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे कमिश्नर आर मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकमिश्नर एन.जी पटेल, दिपक गवाय व इतर कस्टम अधिका-यांनी सदर कारवाई केली. हे तस्करीचे सोने कुठे नेण्यासाठी आणले होते व कुठून आणले होते याबाबत अधिक तपास चालू आहे.

ह्या आर्थिक वर्षात दाबोळी विमानतळावर अजून पर्यंत २ कोटी ५४ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त
१ एप्रलि २०१८ ते अजून पर्यंत विविध तस्करीच्या प्रकरणात दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी एकूण २ कोटी ५४ लाख ५० हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहीती कस्टम अधिकाºयांनी दिली. याबरोबरच दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी चालू आर्थिक वर्षात विविध प्रकरणात कारवाई करून बेकायदेशीर रित्या नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असलेली ७५ लाख १४ हजार रुपयांची विविध विदेशी चलने जप्त केली आहे.

Web Title: Gold worth 18 lakh rupees in Dabolia airport confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा