गोमेकॉत 'ओ' पॉझिटिव्ह 'ए' पॉझिटीव्ह रक्ताचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 10:16 PM2018-02-27T22:16:44+5:302018-02-27T22:16:44+5:30
ओ पॉझिटीव्ह आणि ए पॉझिटीव्ह गटाच्या रक्ताचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत तुटवढा निर्माण झाला आहे. सर्वाधिक मागणी असणा-या या रक्तगटाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणिबाणीच्या प्रसंगी रुग्णाला या रक्ताची गरज भासली तर काय करावे असा प्रश्न समोर राहिला आहे.
पणजी: ओ पॉझिटीव्ह आणि ए पॉझिटीव्ह गटाच्या रक्ताचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत तुटवढा निर्माण झाला आहे. सर्वाधिक मागणी असणा-या या रक्तगटाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणिबाणीच्या प्रसंगी रुग्णाला या रक्ताची गरज भासली तर काय करावे असा प्रश्न समोर राहिला आहे.
ओ पॉझिटीव्ह आणि ए पॉझिटीव्ह रक्तगटाचे लोक खूप असतात. त्यामुळे सहाजिकच या गटासाठी दातेही खूप असतात. त्यामुळे या गटाच्या रक्ताची गोमेकॉच्या रक्तपेढीत सहसा कधी चणचण भासत नाही. मागील चार दिवसांपासून मात्र या रक्तगटाच्या रुग्णांना रक्तपेढीतून रक्त मिळणार नाही. कारण या रक्काचा गोमेकॉतील रक्तपेढीचा साठा संपलेला आहे. गोमेकॉच्या रक्तपेढीतूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसात अपघातांचे प्रमाण वाढले होते. अनेक अपघातग्रस्ताना कॅज्युअल्टीत दाखल करण्यात आले होते. अशा आणिबाणीच्या प्रसंगी रक्तपेढीतील रक्त वापरावे लागते. ओ पॉझिटीव्ह हा रक्तगट काही अपवाद वगळल्यास सर्वच रक्तगटाच्या लोकांसाठी वापरता येत असल्यामुळे ह्या ह्या रक्तगटाचे रक्ताचा अधिक वापर केला जातो. तसेच या दिवसात अपघातात सापडलेल्या ज्या रग्णांना ए पॉझिटिव्ह रक्तगटाचे होते. त्यामुळे या रक्तगटातील रक्तपेढीतील रक्त संपले असावे अशी माहिती कॅज्यअल्टीतील एका अधिका-याकडून देण्यात आली.
या विषयी गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवानंद बांदेकर यांना विचारले असता त्यांनी अधिक रुग्णांना रक्त देण्यात आल्यानेच तुटवढा झाला असावा असे सांगितले. परंतु ही तात्पुरती स्थिती असून गोमेकॉची रक्तपेढी आतापर्यंत दात्यांनीच समृद्ध केली आहे आणि निर्माण झालीली तात्पुरती तूटही तेच भरून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे ही फार मोठी चिंतेची बाब नसल्याचेही ते म्हणाले.
दात्यांना आवाहन
गोमेकॉच्या रक्तपेढीत निर्माण झालेला तुटवढा भरून काढण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन गोमेकॉकडून दात्यांना करण्यात आले आहे. विशेषत: ओ पॉझिटीव्ह आणि ए पॉझिटीव्ह रक्तगटाच्या व्यक्तीना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोमेकॉत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या दरम्यान दाते येवून रक्तदान करू शकतात. अधिक माहितीसाठी २४५८७२४ व २४९५०३२ या क्रमांकावर रक्तपेढी विभागाशी दाते संपर्कही करू शकतात.