लोकसभासाठीही गोमंतकीय भाजपसोबत: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:24 PM2023-05-08T15:24:17+5:302023-05-08T15:24:50+5:30

सावंत हे सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आहेत तेथूनच त्यांनी प्रतिक्रिया दिली.

gomantakiy with bjp for lok sabha too says chief minister pramod sawant | लोकसभासाठीही गोमंतकीय भाजपसोबत: मुख्यमंत्री

लोकसभासाठीही गोमंतकीय भाजपसोबत: मुख्यमंत्री

googlenewsNext

साखळी आणि फोंडा नगरपालिका निवडणुकीत भाजपला निर्विवाद सत्ता मिळाल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन्ही पालिकामधधील नागरिकांचे आभार मानले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतही गोमंतकीय जनता भाजपसोबत राहील आणि २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

सावंत हे सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आहेत तेथूनच त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, साखळीतील लोकांनी भाजपने गेल्या १२ वर्षात केलेल्या विकासकामांना साथ देऊन नगरपालिकेत सत्तांतर घडवले आहे. कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून दोन्ही पालिकांमधील नगराध्यक्ष ठरवला जाईल. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील लोक भाजपाच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे या निकालामुळे स्पष्ट झाले. दरम्यान, कर्नाटक राज्यातही विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून प्रतिसाद मिळत असून तेथेही भाजपाचे बहुमतातील सरकार सत्तेत येईल, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: gomantakiy with bjp for lok sabha too says chief minister pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.