गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री

By पूजा प्रभूगावकर | Published: July 6, 2024 04:26 PM2024-07-06T16:26:39+5:302024-07-06T16:27:39+5:30

राज्यातील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना "करियर गायडन्स " हा विषयावर व्हेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Gomantika students should take a leap in the sky: Chief Minister | गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री

गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री

पणजी : पुढील चंद्रयान मोहिमेवेळी गोमंतकीय विद्यार्थ्यांना आकाशात झेप घेणे का शक्य नाही ?. त्यांनी ही झेप घ्यावी अशी आपली इच्छा असून, त्यासाठी रिसर्च, इनोव्हेशन व आयटी सेक्टरच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकार सर्व ती मदत करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राज्यातील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना "करियर गायडन्स " हा विषयावर व्हेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. इस्त्रोने आकाशात सोडलेल्या चंद्रयानचा पुढील भाग हा गोव्यातील पिळर्ण येथील एका फॅक्ट्रीत तयार झाला होता. गांमतकीय व्यवसायिकाची ही फॅक्ट्री आहे. चंद्रयान मोहिमेत गोव्याचाही सहभाग होता, हे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, की दहावीनंतर कुठले शिक्षण घ्यावी, करियर कुठले घडवावे यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावे. विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांवर शिक्षकांनी लक्ष केंद्रित करून त्यांच्याशी याविषयी वैयक्तिरीत्या बोलावे असे त्यांनी सांगितले.

Web Title: Gomantika students should take a leap in the sky: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.