महिलेशी गैरवर्तनप्रकरणी गोमेकॉ कर्मचारी निलंबित
By वासुदेव.पागी | Published: September 12, 2023 07:01 PM2023-09-12T19:01:19+5:302023-09-12T19:38:21+5:30
अंतर्गत चौकशीत तो दोषी आढळल्यास त्याच्यावर बडतर्फीचीही कारवाई होवू शकते.
पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणे गोमेकॉच्या पुरूष कर्मचाऱ्याला महागात पडले. महिलेच्या तक्रारीनंतर कथित गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
सुमेश होबळे असे या गोमेकॉच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने दोन दिवसांपूर्वी आपल्याच सहकारी महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले होते. त्याची तक्रार महिलेने थेट आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची दखल घेऊन राणे यांनी गोमेकॉचे डीन डॉ शिवानंद बांदेकर यांना या प्रकरणात चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्याच्या अंतर्गत चौकशीचा आदेश देण्यात आले आहे. तसेच त्याला निलंबितही करण्यात आले आहे.
आरोग्य मंत्र्यानी स्वत:च ट्वीटकरून ही माहिती दिली आहे. अंतर्गत चौकशीत तो दोषी आढळल्यास त्याच्यावर बडतर्फीचीही कारवाई होवू शकते.