गोमेकॉत आयव्हीएफ ट्रीटमेंटसाठी १०० जोडप्यांनी केली नोंदणी: आरोग्य मंत्री राणे
By पूजा प्रभूगावकर | Published: November 3, 2023 01:11 PM2023-11-03T13:11:52+5:302023-11-03T13:12:21+5:30
बांबोळी येथील गोमेकॉत आयव्हीएफ ट्रीटमेंटसाठी १०० जोडप्यांनी नोंदणी केल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी ट्वीटव्दारे दिली आहे.
पणजी: बांबोळी येथील गोमेकॉत आयव्हीएफ ट्रीटमेंटसाठी १०० जोडप्यांनी नोंदणी केल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी ट्वीटव्दारे दिली आहे.
मोफत आयव्हीएफ ट्रीटमेंट देणारे गोमेकॉ हे देशातील पहिले सरकारी इस्पितळ आहे. आयव्हीएफ ट्रीटमेंटचा सर्वसाधारण खर्च हा ५ ते ७ लाखांपासून सुरु असून गोव्यात आयव्हीएफ सुविधा ठरावीक इस्पितळांतच आहे. अशा पालकत्व अनुभवण्याची इच्छा असणारी जोडपी या उपचारांसाठी गोव्याबाहेर जातात. तर काहींना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे या जोडप्यांना हे उपचार गोमेकॉत माेफत पध्दतीने सुरु केले आहेत.
सरकारने ऑगस्ट पासून हे उपचार गोमेकॉत सुरु केले आहेत. या आयव्हीएफ ट्रीटमेंटसाठी गोमेकॉत १०० जोडप्यांनी नोंदणी केली आहे. या ट्रीटमेंटसाठी आवश्यक ती उपकरणे खरेदी व सदर उपक्रम सशक्त करण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत निधी वापरण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.‘आयव्हीएफ’ उपचार पद्धतीला ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’, असे म्हटले जाते.