गंभीर कोविड रुग्णांवर गोमेकॉतच उपचार - विश्वजित राणो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 03:08 PM2020-08-14T15:08:34+5:302020-08-14T15:08:55+5:30
आरोग्य मंत्री विश्वजित राणो, आरोग्य सचिव निला मोहनन व डॉ. उदय काकोडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्रवारी ही माहिती येथे दिली.
पणजी : ज्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांची अन्य आजारांमुळे गंभीर अशी स्थिती होते, अशा प्रकारच्या रुग्णांवर आता बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळातच उपचार केले जाणार आहेत. गोमेकॉतील तीन वॉर्ड्स त्यासाठी आरक्षित केले गेले आहेत. आरोग्य यंत्रणोने ज्या दोघा कोविड रुग्णांना सर्वात प्रथम प्लाज्मा थेरपी दिली होती, ते कोरोनामुक्त झाले, त्यांची चाचणी निगेटीव्ह आली.
आरोग्य मंत्री विश्वजित राणो, आरोग्य सचिव निला मोहनन व डॉ. उदय काकोडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्रवारी ही माहिती येथे दिली. आरोग्य खाते, गोमेकॉ, कोविड इस्पितळ यांची संयुक्त बैठक शुक्रवारी झाली. ज्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार असतात, त्यांना कोविडची लागण झाल्यानंतर त्यांचाही जीव वाचायला हवा म्हणून काय करता येईल यावर विचार करून एक योजना तयार केली गेली. त्या योजनेनुसार गोमेकॉ इस्पितळातील तीन वॉर्ड्स गंभीर रुग्णांसाठी वापरले जातील. या वॉर्डाची रचनाच अशी आहे, की तिथे कोविड रुग्ण असले म्हणून गोमेकॉत येणा:या इतर व्यक्तींना किंवा रुग्णांना त्याचा संसर्ग होणार नाही. मडगाव येथील ईएसआय इस्पितळातील ज्या रुग्णांना गोमेकॉत उपचारांसाठी नेताच येणार नाही अशा रुग्णांवर ईएसआय इस्पितळातच उपचार केले जातील. श क्रिया झाल्यानंतर कोविडच्या रुग्णांना गोमेकॉत 30 खाटांच्या वॉर्डमध्ये ठेवले जाईल, असे राणो यांनी सांगितले.
एकूण चौदा कोविडग्रस्तांवर आतापर्यत प्लाज्मा थेरपी केली गेली. त्यापैकी ज्या दोघा रुग्णांवर सर्वात अगोदर थेरपी केली गेली होती, त्यांची कोविड चाचणी निगेटीव आली. इतरांची चाचणी यापुढे केली जाईल, असे श्रीमती मोहनन यांनी स्पष्ट केले. डॉ. काकोडकर हे मडगाव येथील ईएसआय इस्पितळाचे प्रमुख आहेत. त्यांनी ईएसआय इस्पितळाविषयीची आकडेवारी दिली व गोव्यात जे कोविडग्रस्तांचे मृत्यू होतात, त्यांचे प्रमाण 1 टक्क्याहून कमी आहे व पूर्ण देशात ते प्रमाण एकदम कमी आहे असे नमूद केले.
ईएसआय इस्पितळात अडिच महिन्यांत रुग्णांवर एकूण 32 प्रसुतीच्या श क्रिया करण्यात आल्या. सातजणांची प्रसुती नॉर्मल पद्धतीने झाली. आतार्पयत कोविड इस्पितळातून 65.8 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले. एप्रिलमध्ये कोविड इस्पितळ सुरू झाले होते व 1 हजार 126 रुग्ण आतार्पयत या इस्पितळात दाखल झाले. त्यापैकी 65 म्हणजे 5.77 टक्के रुग्णांना मरण आले. ज्यांना अगोदरच अत्यंत गंभीर असे आजार होते व ज्यांना उच्च रक्तदाब, अनेक वर्षे डायबेटीस किंवा किडणीचा आजार होता अशा रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला. समजा या रुग्णांना कोविड झाला नसता तरी त्यांचा मृत्यू त्यांना असलेल्या गंभीर आजारांमुळे झाला असता असा दावा डॉ. काकोडकर यांनी केला. आयसीयूमध्ये एकूण 166 रुग्णांना दाखल करावे लागले, त्यापैकी 41 रुग्णांचा मृत्यू झाला.