सुखद वृत्त: जून, जुलै व आॅगस्ट महीन्यात वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या हद्दीतून एकही डेंग्यू रुग्ण आढळला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 07:50 PM2020-09-03T19:50:59+5:302020-09-03T19:51:10+5:30
गेल्या वर्षी (२०१९ सालात) मुरगाव तालुक्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळण्यास सुरू झाल्याने नागरिकात मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: मागच्या तीन महीन्यात वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या हद्दीत येणाºया विविध भागातून एकही डेंग्यूचा रुग्ण आढळलेला नसल्याचे समाधानकारक वृत्त सामोर आले आहे. यावर्षी जानेवारी ते मे अशा पाच महीन्यात वास्को आरोग्य केंद्राच्या हद्दीतील विविध भागात ४५ डेंग्यू रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते ठीक झाल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
गेल्या वर्षी (२०१९ सालात) मुरगाव तालुक्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळण्यास सुरू झाल्याने नागरिकात मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली होती. २०१९ सालात मुरगाव तालुक्यातील विविध भागात राहणारे चार नागरिकांचा डेंग्यू सदृश तापावर उपचार घेताना मृत्यू झाला असून यात तीन पुरूष व एका महीलेचा समावेश होता. गेल्यावर्षी एके बाजूने मुरगाव तालुक्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात डेंग्यू संशयित रुग्ण आढळत असतानाच याचकाळात डेंग्यू सदृश तापावर उपचार घेताना चार जणांचा मृत्यू झाल्याने डेंग्यूबाबत मुरगाव तालुक्यातील नागरिकात मोठी भिती निर्माण झाली होती. २०१९ च्या पूर्ण वर्षात चिखली उपजिल्हा इस्पितळात मुरगाव तालुक्यातील विविध भागातील नागरिकांना डेंग्यू सदृश ताप येत असल्याने त्यांना येथे दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहीती इस्पितळातील विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली होती. याव्यतिरिक्त वास्को शहरात व जवळपासच्या परिसरात असलेल्या विविध खासगी इस्पितळात सुद्धा अनेक डेंग्यू सदृश ताप येणाºया रुग्णावर उपचार करण्यात आला होता. गेल्यावर्षी डेंग्यूने मुरगाव तालुक्यात हैदोस घातल्याने याच्या भितीने नागरिकांची झोप उडवली होती. डेंग्यूवर आळा घालण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या डॉक्टर तसेच अधिकाºयांनी गेल्यावर्षी विविध पावले उचलण्याबरोबरच पाणी साचून डेंग्यू पसरविणाºया डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे वेळोवेळी आवाहन केले होते.
यावर्षी मुरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाल्यानंतर पावसाळ््यात मागच्या वर्षा सारखे नागरिकांना डेंग्यूची बाधा तर होणार नाही ना अशा प्रकारची भिती अनेकात निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने यावर्षाच्या जून, जुलै व आॅगस्ट अशा तीन महीन्यात वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या हद्दीत येणाºया विविध भागातून एकही डेंग्यू रुग्ण आढळलेला नसल्याची माहीती डॉ. रश्मी खांडेपारकर यांच्याकडून प्राप्त झाली. वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांना डेंग्यूबाबत माहीती घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्या हद्दीत येणाºया विविध भागातून (वास्को शहर, बायणा, सडा, मांगोरहिल, शांतीनगर, नवेवाडे, वाडे, चिखली, खारीवाडा व इतर परिसर) यावर्षाच्या सुरवातीपासून मे महीन्यापर्यंत ४५ डेंग्यू रुग्ण आढळलेले असल्याची माहीती त्यांनी दिली. यासर्व रुग्णावर विविध इस्पितळात उपचार केल्यानंतर ते ठीक होऊन घरी परतल्याची माहीती त्यांनी दिली. यावर्षात जानेवारी महीन्यात सर्वात जास्त असे २० डेंग्यू रुग्ण विविध परिसरातून आढळलेले असून जून, जुलै व आॅगस्ट अशा तीन महीन्यात एकही डेंग्यू रुग्ण आढळलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ वर्षाच्या जून, जुलै व आॅगस्ट अशा तीन महीन्यात मुरगाव तालुक्यातील विविध भागातील ३१२ जणांवर चिखली उपजिल्हा इस्पितळात डेंग्यु सदृश तापावर उपचार करण्यात आल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली होती. यावर्षाच्या फेब्रुवारी महीन्यात ८, मार्च महीन्यात ४, एप्रिल महीन्यात ६ व मे महीन्यात ७ डेंग्यू रुग्ण आढळलेले असल्याची माहीती डॉ. खांडेपारकर यांनी पुढे दिली. मागच्या काही वर्षात पावसाळ््यात डेंग्यूची प्रकरणे वाढत असल्याचे दिसून आले असून सुदैवाने यंदा वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या हद्दीत पावसाळ््यात डेंग्यूची प्रकरणे आढळलेली नाहीत. सप्टेंबर महीन्यात सुद्धा पावस पडत असून विविध ठीकाणी पाणी साचून डेंग्यू पसरविणाºया डासांची पैदास होऊन यामुळे लोकांना त्रास निर्माण न व्हावा यासाठी सर्व प्रकारची वास्को शहरी आरोग्य केंद्र पावले उचलणार असून नागरिकांनी सुद्धा पाणी साचून डेंग्यू पसरविणारे डासांची पैदास होऊ नये याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. रश्मी खांडेपारकर यांनी माहीतीत शेवटी बोलताना सांगितले.