जामिन भेटला मात्र अंगातील रग काही कमी झाली नाही, संशयिताची पुन्हा कोठडीत रवानगी
By सूरज.नाईकपवार | Published: January 3, 2024 08:52 PM2024-01-03T20:52:02+5:302024-01-03T20:52:23+5:30
संशयिताच्या एकूण वर्तनाचे न्यायालयाने गंभीर दखल घेताना त्याचा जामीन अर्ज रद्दबातल करुन त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवून देण्याचा आदेश दिला.
मडगाव: जामिन भेटला खरा मात्र अंगातील रग काही केल्याकमी झाली नव्हती. परिणती जामिन रद्द झालाच व पुन्हा न्यायालयीन कोठडीत जाण्याची पाळी ओढावली. शरिफ शेख असे या संशयिताचे नाव आहे. दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात आज बुधवारी हे प्रकरण सुनावणीस आले.
संशयिताच्या एकूण वर्तनाचे न्यायालयाने गंभीर दखल घेताना त्याचा जामीन अर्ज रद्दबातल करुन त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवून देण्याचा आदेश दिला.संशयिताविरोधात मडगाव पोलिस ठाण्यातत्या पिडीिताने तक्रार नोंदविली होती. त्यात आपल्यावर संशयिताने चाकूने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असे म्हटले होते. २८ ऑक्टोबर २०२१ साली वरील घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयितावर भादंसंच्या ३०७ कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात नंतर संशयिताला जामीनही मंजूर झाला होता.त्यावेळी त्याला काही अटीही घालण्यात आल्या होत्या.
दरम्यान जामिन मिळाल्यानंतर २ नोव्हेंबर २०२३ रोजी संशयिताने त्या पिडिताच्या दुकानाजवळ जाउन पुन्हा जाउन तिला लोखंडी सळीने मारहाण करण्याचा प्रयत्न करताना, तिचा गळा आवळण्याचाही प्रयत्न केला. कशीबशी तीने त्यातून आपली सुटका करुन घेतली होती. न्यायालयात या खटल्यात पिडीतही एक साक्षिदार होती. मागाहून पिडिताने साक्षिदार सरंक्षण योजनातंर्गंत अर्ज सादर केला. पोलिसांच्या समिती बैठकीसमोर हा अर्ज आला असता, बैठकीत मडगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी आपला संपूर्ण अहवाल न्यायालयापुढे सादर करताना , संशयिताचा जामिन अर्ज रद्द करावा अशी मागणी केली होती.
न्यायालयाने एकूण सर्व घटनेची गंभीर दखल घेताना संशयिताचा जामीन रद्द केला. संशयिताला जामिन देताना त्याला ज्या अटी घातल्या होत्या त्याचा त्यांनी भंग केला आहे. संशयिताने पिडितालाही धमकी दिली. ती भयभीत आहे. ती न्यायालयात येण्यासही अनुस्तुक आहे असे निरीक्षण नोंदविले.