गोव्यात किना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकार सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:50 AM2017-09-18T05:50:08+5:302017-09-18T05:50:11+5:30

गोव्यातील सागरकिना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच मोठी व्यापक उपाययोजना केली जात आहे. एक महिन्याने नवा पर्यटन मोसम सुरू होत असून अनुचित घटनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची बदनामी होऊ नये म्हणून सरकार कृती आराखडा तयार करत आहे.

Government cautions for tourists safety in coastal areas of Goa | गोव्यात किना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकार सतर्क

गोव्यात किना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकार सतर्क

Next

सद्गुरू पाटील 

पणजी : गोव्यातील सागरकिना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच मोठी व्यापक उपाययोजना केली जात आहे. एक महिन्याने नवा पर्यटन मोसम सुरू होत असून अनुचित घटनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची बदनामी होऊ नये म्हणून सरकार कृती आराखडा तयार करत आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोवा पोलीस, शॅक व्यावसायिक, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स संघटनांचे पदाधिकारी, हॉटेल व्यावसायिक, जीवरक्षक संस्था व पर्यटन खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेतली. कायदा सचिवांची एक समितीही स्थापन केली आहे. समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू रोखण्याचे रोखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
महिन्याभरात एक कोटीपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ पकडून पंधरापेक्षा जास्त व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे अलीकडेच दोन पर्यटकांचा हणजूण येथे मृत्यू झाला. अमली पदार्थांच्या व्यापारास आळा घालण्याचेही प्रयत्न आहेत.
गोव्यात वाहन अपघातांमध्येही पर्यटकांचे बळी जातात. मुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यांनी किनारपट्टीत सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४०० जीवरक्षक गोव्याच्या १०५ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीत असतात. ही संख्या वाढविली जाणार आहे.
>आम्ही पर्यटकांच्या सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही. गोव्याचे पर्यटन अधिक सुरक्षित बनविण्यासाठी कृती योजना तयार केली जात आहे. बुडून मृत्यू पावणाºयांचे प्रमाण रोखण्यासाठी एक शासकीय समितीही नेमली गेली आहे. - बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री

Web Title: Government cautions for tourists safety in coastal areas of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.