माध्यम धोरणावर सरकार ठाम
By Admin | Published: April 27, 2016 01:58 AM2016-04-27T01:58:22+5:302016-04-27T02:02:51+5:30
पणजी : विधानसभा निवडणुका अवघ्या दहा महिन्यांवर आलेल्या असताना राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी रणकंदन
पणजी : विधानसभा निवडणुका अवघ्या दहा महिन्यांवर आलेल्या असताना राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी रणकंदन सुरू झाले आहे. संघाचे नेते व भारतीय भाषा सुरक्षा मंचने कडवी टीका करत राज्यभर भाजपविरोधात वातावरण निर्मिती चालविली असली, तरी
आपल्या धोरणात कोणताच बदल
करायचा नाही, असे मंगळवारी भाजपच्या सर्व मंत्री-आमदारांच्या संयुक्त बैठकीत ठरविण्यात आले.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिल्लीहून परतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पर्वरी येथील मंत्रालयात भाजपच्या सर्व मंत्री-आमदारांची बैठक घेतली. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी सध्या सुरू असलेल्या प्रचंड वादाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री, आमदारांना दिली. माध्यमप्रश्नी आम्ही सध्या स्वीकारलेले धोरण हे योग्य आहे. डायोसेझन संस्थेच्या १३६ इंग्रजी शाळांना अनुदान दिले जात असून ते कायम राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री, आमदारांना सांगितले व सर्वांनी ते मान्य केले. आम्ही माध्यमप्रश्नी सध्याचा तोडगा काढताना भारतीय भाषा सुरक्षा मंचला म्हणजेच संघाच्या नेत्यांना दोन वर्षांपूर्वी विश्वासात घेतले होते, असे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी बैठकीनंतर ‘लोकमत’ला सांगितले. भाषा मंचने आता आंदोलन करण्याचे कारणच राहिलेले नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
(खास प्रतिनिधी)