पोर्तुगीज पासपोर्टधारक गोमंतकीयांना भारत सरकारने दुहेरी नागरिकत्व दयावे!
By सूरज.नाईकपवार | Published: December 22, 2023 04:28 PM2023-12-22T16:28:49+5:302023-12-22T16:29:05+5:30
आपण यासंबधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मडगाव: ज्या गोमंतकीयांनाकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे त्यांना भारत सरकारने दुहेरी नागरिक्तव दयावे अशी मागणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली आहे. आपण यासंबधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील वार्का येथे आज शुक्रवारी आलेमाव यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी वरील मागणी केली.
गोवा मुक्तीदिनी १९ डिसेंबर रोजी त्यांनी पोर्तुगीजाला आपला सलाम असे वक्तव केले होते, त्यामुळे राज्यभर त्यासंबधी तीव्र रोष पसरला होता. आपण जे काही वक्तव केले होते. त्याचा विपर्यास अर्थ लावला गेला आहे. पोर्तुगीज चांगले की वाईट हे लोकांना माहिती आहे. मात्र त्यांनी गोमंतकीयांना पोतुर्गीज पासपोर्टची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे आज अनेक गोमंतकीय हा पासपाेर्ट घेउन युरोपात नाेकरी करीत आहेत. ते तेथे कायमचे राहायला गेलेले नाहीत. फक्त आपल्या रोजीरोटीसाठी गेलेले आहेत. ते तेथे मतदानही करीत नाहीत. असेही ते म्हणाले.
ज्यांच्याकडे पोतुर्गीज पासपोर्ट आहेत त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द केला जात असल्याने गोमंतकीय सदया संकटात सापडले आहेत. गोव्याचे माजी खासदार एदुआर्द फालेरो यांनी या पासपोर्ट धारकांसाठी ओसीआय सुविधा उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द केला जाउ शकत नाहीत. पुदुचेरीत फ्रँच राजवट होती. येथील लोकांना सरकारने दुहेरी नागरिकत्व बहाल केले आहे असे आलेमाव यांनी सांगितले.