सरकारी कार्यालये दोन हजारांच्या नोटा स्वीकारणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:48 PM2023-05-23T12:48:36+5:302023-05-23T12:49:32+5:30

२ हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे परिपत्रक राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढले होते.

government offices will accept 2000 notes chief minister information | सरकारी कार्यालये दोन हजारांच्या नोटा स्वीकारणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

सरकारी कार्यालये दोन हजारांच्या नोटा स्वीकारणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : येत्या ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, तसेच बँकांमध्ये या नोटा स्वीकारल्या जातील. हजारांच्या २ नोटा ३० सप्टेंबरपर्यंत चलनात असतील. सरकारी असो किंवा निम सरकारी कार्यालये, सर्वत्र या नोटा स्वीकारल्या जातील. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दरम्यान, २ हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे परिपत्रक राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढले होते. त्यावर ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने, त्वरित हे परिपत्रक मागे घेतले आहे. त्यामुळे आता फेडरेशनअंतर्गत येणाऱ्या सर्व सहकार भांडारांमध्येही ग्राहकांकडून २ हजारांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत.

गोवा राज्य मार्केटिंग फेडरेशनने सहकार भांडारांमध्ये २ हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे परिपत्रक जारी केले होते. मात्र, ग्राहकांच्या गोंधळनंतर ते त्वरित मागे घेतले. सहकार भांडार आता ग्राहकांकडून २ हजारांच्या नोटा स्वीकारत आहेत, असे मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशीनाथ नाईक यांनी सांगितले.


 

Web Title: government offices will accept 2000 notes chief minister information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा