सरकारने धिरयोंना मान्यता द्यावी
By admin | Published: September 22, 2015 12:50 AM2015-09-22T00:50:14+5:302015-09-22T00:50:25+5:30
हरमल : गणेशचतुर्थीचे औचित्य साधून भोम पठारावर धिरयोचे यशस्वी आयोजन झाल्याने उत्साहित झालेल्या धिरयोप्रेमींनी सोमवारी हरमल येथे एकत्र येत सरकारने धिरयोंना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी केली.
हरमल : गणेशचतुर्थीचे औचित्य साधून भोम पठारावर धिरयोचे
यशस्वी आयोजन झाल्याने उत्साहित झालेल्या धिरयोप्रेमींनी सोमवारी हरमल येथे एकत्र येत सरकारने धिरयोंना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी केली.
सुमारे सहा हजारांच्या संख्येने जमलेल्या धिरयोप्रेमींसमोर बोलताना सुखानंद नाईक व इतरांनी सांगितले की, बैलांच्या झुंजी अभावाने होतात. झुंजी लागल्या की बैलाचे कसब ध्यानी येते. त्यातून पाहणाऱ्याची रुची वाढते. यात कायदेशीर-बेकायदेशीर असे काही नसून शेतकऱ्यांच्या शेतात देखील झुंजीचे प्रकार वारंवार घडत असतात. त्या वेळी कोणी या झुंजी कायदेशीर की बेकायदेशीर हे पाहत नाही. मग बैलांच्या झुंजी भरवण्यास आडकाठी का, असा प्रश्न या वेळी करण्यात आला.
धिरयो हा प्रकार मुळीच हिंस्र प्रकारात मोडणारा नाही. उलट झुंजीवेळी बैलाला जखम झाल्यास लगेच औषधोपचार केले जातात, असे समीर वायंगणकर यांनी सांगितले.
पाळीव-वन्य मुक्या प्राण्यांबाबत सहानुभूती बाळगणे योग्य असून भटक्या गुरांत झुंजी लागतात त्या वेळेस कोणती संघटना आवाज उठवित नाही, मग बैलांच्या झुजी आयोजनास विरोध का, असा प्रश्न उपस्थित करत पारंपरिक सणावेळी धिरयोंना मान्यता द्यावी, अशी मागणी संतोष कोरकणकर यांनी केली.
धिरयो हा लोकमान्यता मिळालेला थरारपट असून याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गोव्यातील धिरयोंची परंपरा जिवंत ठेवावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
सरकारने धिरयोंना मान्यता दिल्यास सट्टा प्रकारावर आपोआप आळाबंद येईल. तसेच सरकारला महसूल प्राप्त होईल. तसेच देश-विदेशातील पर्यटकांना आकृष्ट करण्यास धिरयो महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी अमित शेटगावकर (मोरजी), आलेसिन रॉड्रिग्स, पात्रिस फर्नांडिस, सुदन वायंगणकर, चंद्रकांत विर्नोडकर, राजन नानोस्कर, फ्रान्सिस फर्नांडिस, सुरेंद्र नाईक, लॉरेन्स डिसोझा, स्वप्नील नाईक, हरिश्चंद्र नाईक आदी
उपस्थित होते.
(प्रतिनिधी)