सरकार उद्योगांना 'दुप्पट एफएआर' देणार! 'इन्व्हेस्ट गोवा २०२४' परिषदेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 11:11 AM2024-01-30T11:11:56+5:302024-01-30T11:12:37+5:30

मंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती.

government will give double far to the industries inauguration of invest goa 2024 conference | सरकार उद्योगांना 'दुप्पट एफएआर' देणार! 'इन्व्हेस्ट गोवा २०२४' परिषदेचे उद्घाटन

सरकार उद्योगांना 'दुप्पट एफएआर' देणार! 'इन्व्हेस्ट गोवा २०२४' परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात अस्तित्वात असलेल्या उद्योगांना दुप्पट चटई निर्देशांक (एफएआर) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असून, यामुळे कारखान्यांचे विस्ताराचे काम सोपे झाले आहे. 'इन्वेस्ट २०२४' परिषदेच्या निमिताने आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.

गुंतवणूकदारांच्या या परिषदेत दोन महत्वाचे समझोता करारही बड़वा कंपन्यांनी सरकारकडे केले. एक समझोता करार सीआयआयचे अध्यक्ष तथा टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लि.चे चेअरमन आर. दिनेश यांच्याकडेही झालेला आहे. याद्वारे एक हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

सरकारने आता नवीन औद्योगिक धोरण व वेअरहाउसिंग धोरण आणले आहे. त्याचबरोबर औद्योगिक विकास महामंडळानेही काही नियम शिथिल करून इज ऑफ डुइंग बिझनेसच्या बाबतीत सुटसुटीतपणा आणला आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

भूखंडांशी संबंधित जीपीएस आणि जीआयएस-आधारित भू बैंकच्या बाबतीत मावीन म्हणाले की, औद्योगिक वसाहती गतीशक्ती पोर्टलशी जोडल्या गेल्याने भूखंडांचे पारदर्शक वाटप होण्यास मदत होईल. टीव्हीएसकडून लॉजिस्टिक तथा वेअरहाऊसिंग पार्क विकसित करण्यासाठी सुमारे १२५ कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एक हजार नोकऱ्या निर्माण होतील.

राज्यातील सर्व २३ औद्योगिक वसाहतीमधील जवळपास २० टक्के जमीन विनावापर असल्याची माहिती देऊन माबीन म्हणाले की, आयडीसीने भूखंडाचे वाटप, हस्तांतरण आणि उप-लीज संबंधित केलेल्या नवीन नियमांमध्ये अनेक गोष्टी सुलभ झालेल्या आहेत. हस्तांतरण शुल्क रद्द करण्याचाही प्रस्ताव आहे.

रसना ग्रुपचे सीएमडी पिरुझ खंबाटा यांनी आपला उद्योग समूह आता काजूधारित पदार्थ व र्पये उत्पादित करणार असल्याचे जाहीर केले. आठ वैद्यकीय उपकरण निर्मात्यांनी इन्व्हेस्ट गोवामध्ये सहभाग घेतलेला आहे. उद्योजक यांच्यासाठी विजेची कमतरता आहे, त्यामुळे वीज प्रकल्पाबाबत चर्चा चालू आहे. पर्यावरणाभिमुख वीज प्रकल्पासाठी धेपो उद्योग समूह योगदान द्यायला तयार आहे.

दोनापावल येथे आयटी हॅबिटॅट

आयटी हॅबिटॅट दोनापावला येथेच येईल, त्यासाठी आधीच जागा निश्चित आलेली आहे. भूतकाळात काय घडले या गोष्टी आता नकोत, असे मावित एका प्रश्नावर म्हणाले.  पर्यावरणाभिमुख उद्योगांचे गोव्यात नेहमीच स्वागत केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे आता आयटी हॅबिटॅट पुनरुज्जीवित
होईल, हे स्पष्ट झाले आहे.

उद्योजकांनी मानसिकता बदलावी : श्रीनिवास धेपो

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष तथा धेपो उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास घेपो यांनी आपल्या उद्योग समूहातर्फे वार्को येथे लवकरच २०० खोल्यांचे पंचतारांकित रिसॉर्ट येणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, राज्य सरकारने उद्योजकांसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. सरकारने काही नियमही बदलून उद्योजकांना अनुकूल असे केलेले आहे. आता उद्योजकांनीच आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.

गोव्यात गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ : सावंत

पणजी : गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे से सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोट सावंत यांनी देश- विदेशातील उद्योजकांनी राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक कराची, असे आवाहन केले आहे.

इन्व्हेस्ट गोवा २०२४' परिषदेच्या उद‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. गोव्याकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका. किनाऱ्यापलीकडेही येथे बरेच काही आहे. गोच्याकडे आर्थिक शक्त्तिगृह म्हणून पाहा. येथे औद्योगिक गुंतवणूक करून गोव्याबरोबरच तुम्हीही मोठे व्हा, असेही ते म्हणाले.

दोनापावला येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री माविन गर्दिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग विस्ताराच्या बाबतीत गोवा आता फार दूर नाही. मेक इन इंडिया सारखी 'मेक इन' ही संकल्पना रुजपू आणि गोव्यात औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणू. 

या परिषदेत राज्य सरकार ४०० हून अधिक प्रतिनिधीसमोर गोवा हे एक आकर्षक व्यवसाय गंतव्यस्थान आहे, असे भक्कमपणे मांडेल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गुंतवणूकदारांशी वन-टू-वन बैठक घेणार आहेत. या परिषदेचा भर लॉजिस्टिक आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती या दोन क्षेत्रांवर आहे. ज्यामध्ये गोव्याचे उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय गुंतवणूक आणू इच्छित असून, रोजगार निर्माण करू पाहत आहे.
 

Web Title: government will give double far to the industries inauguration of invest goa 2024 conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.