सरकारचे दाबोळी विमानतळ संपवण्याचे षडयंत्र सुरू

By पंकज शेट्ये | Published: July 19, 2023 09:22 PM2023-07-19T21:22:30+5:302023-07-19T21:22:40+5:30

दाबोळी विमानतळाबाहेर निषेध करताना एल्वीस गोंम्स यांनी केला आरोप

Government's conspiracy to end Daboli airport is on | सरकारचे दाबोळी विमानतळ संपवण्याचे षडयंत्र सुरू

सरकारचे दाबोळी विमानतळ संपवण्याचे षडयंत्र सुरू

googlenewsNext

वास्को: हळू हळू करून दाबोळी विमानतळ संपवण्याचे षडयंत्र सरकारने चालू केले आहे. त्यामुळेच दोन दिवसानंतर आठवड्यातून तीन वेळा दाबोळी विमानतळावरून गॅटविक येथे जाणारे एअर इंडीयाचे आंतरराष्ट्रीय विमान येथून बंद होऊन मोपा विमानतळावरून सेवा सुरू करणार आहे. भविष्यात दाबोळीवरून जाणारी इतर आंतरराष्ट्रीय विमाने येथील सेवा बंद करून मोपा विमानतळावरून प्रवाशांना सेवा द्यायला सुरवात करणार आहे. तसे केल्यानंतर दाबोळीची अर्थव्यवस्था बिघडून दाबोळी विमानतळ भविष्यात टीकणे कठीण होणार आहे. दाबोळी पूर्वीसारखाच कायमस्वरुपू टीकवून ठेवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असून त्यासाठी आम्ही आणखीन उचित पावले उचलणार असल्याचे कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्स यांनी सांगितले.

बुधवारी (दि.१९) दाबोळी विमानतळाबाहेर गोवा युवा कॉग्रेसच्या पदाधिकारी - कार्यक्रर्त्यांनी जमून येथून गॅटविक येथे जाणारी एअर इंडीयाची आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होऊन मोपावरून सुरू होत असल्याने त्याचा निषेध दर्शविला. यावेळी त्यांच्याबरोबर दक्षिण गोवा युवा कॉग्रेसचे अध्यक्ष महेश नदार, गोवा प्रदेश कॉग्रेस समितीचे सरचिटणीस प्रदीप नाईक, कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्स इत्यादी उपस्थित होते. १९ जून ला मी वास्कोत येऊन दाबोळी विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा हाताळणाºया कंपनींना सरकार येथील सेवा बंद करून मोपावरून चालू करण्यासाठी दबाव आणत असल्याचे सांगितले होते अशी माहीती गोंम्स यांनी दिली. तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट नातावडे आणि मंत्री मावीन गुदिन्हो यांनी मी बेकार पडल्याने अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याची टीका केली होती. दोन दिवसानंतर दाबोळीवरून आठवड्यातून तीनवेळा गॅटविक येथे जाणारी ‘एअर इंडीया’ ची आंतरराष्ट्रीय विमानसेवा येथून बंद होऊन मोपावरून सुरू होणार असून यावरूनच आता कोण बेकार पडलेला आहे आणि कोण खोटे बोलत आहे ते सिद्ध झाल्याचे गोंम्स म्हणाले.

सरकारने हळू हळू करून दाबोळी विमानतळ संपवण्याचे षडयंत्र सुरू केले असून भविष्यात ते दाबोळीवरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाºया इतर कंपनीवरसुद्धा दबाव आणून येथील विमानसेवा बंद करून मोपावर नेणार असल्याचा आरोप गोंम्स यांनी केला. भविष्यात ओमान, कतार अशा ठीकाणी जाणारी दाबोळी विमानतळावरील विमानसेवा येथून बंद होऊन मोपा विमानतळावरून सुरू होणार असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली. दाबोळीवरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्यानंतर येथून दक्षिण गोव्यातून विदेशात प्रवास करणाºया लोकांना त्याचा त्रास होण्याबरोबरच दाबोळी विमानतळाची अर्थव्यवस्था बिघडणार आहे. त्यामुळे भविष्यात दाबोळी विमानतळ टीकणे कठीण ठरणार असल्याचे ते म्हणाले. मोपा विमानतळाचे खासगीकरण केलेले असून खासगी व्यवस्थापनाच्या फायद्यासाठी सरकार दाबोळी विमानतळ संपवण्यासाठी पावले उचलत असल्याचा आरोप गोंम्स यांनी केला. आम्ही मोपा विमानतळाच्या मूळीच विरोधात नाहीत. तेथून नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा चालू करावी, मात्र तसे न करता दाबोळीवरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करून ती मोपावर नेण्याचा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे.

आम्ही दाबोळी विमानतळाच्या हीतासाठी आणि तो पूर्वी सारखाच चालू रहावा यासाठी पुढाकार घेतलेला असून भविष्यात दाबोळीच्या हीतासाठी आम्ही अन्य विविध पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निषेधासाठी उपस्थित असलेल्या गोवा प्रदेश कॉग्रेस समितीचे सरचिटणीस प्रदीप नाईक, दक्षिण गोवा युवा अध्यक्ष महेश नदार यांनी गोवा सरकार दाबोळी विमानतळ बंद करण्याचे षडयंत्र चालवत असल्याचा आरोप केला. बुधवारी दाबोळी विमानतळाबाहेर निषेध करण्यासाठी युवा कॉग्रेसचे कार्यकर्ते - पदाधिकारी जमलेल्या वेळी तेथे कुठलाच अनुचित प्रकार न घडावा यासाठी पोलीसांनी चौख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले.

Web Title: Government's conspiracy to end Daboli airport is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा