सरकारचा मुड आॅफ!
By admin | Published: August 20, 2015 02:14 AM2015-08-20T02:14:25+5:302015-08-20T02:14:48+5:30
पणजी : नागपंचमीच्या सणानिमित्ताने राज्यात बुधवारी सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना सरकारसाठी मात्र हा दिवस वाईट गेला. एका बाजूने सत्ताधारी पक्षाचे
पणजी : नागपंचमीच्या सणानिमित्ताने राज्यात बुधवारी सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना सरकारसाठी मात्र हा दिवस वाईट गेला. एका बाजूने सत्ताधारी पक्षाचे मोठे राजकीय शत्रू दिगंबर कामत यांना विशेष न्यायालयाने लाचखोरी प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला, तर दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे साडू असलेले आयडीसीचे अधिकारी घनश्याम ऊर्फ दिलीप मालवणकर हे लाच प्रकरणीच ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले. या दुहेरी धक्क्याने हादरलेल्या सरकारचा सणासुदीच्या दिवशी मुड आॅफ झाला.
या दोन्ही घटनांमुळे सरकार काहीसे सुन्न झाल्याचा अनुभव आला. नेमकी कोणती प्रतिक्रिया द्यावी हे बराच वेळ सत्ताधाऱ्यांमधील अनेकांना समजत
नव्हते. कामत यांना अटकपूर्व जामीन
मंजूर होणार नाही व त्यामुळे त्यांना अटक करावीच लागेल, असे सरकारला वाटले होते. सरकारने पोलिसांमार्फत अटकेची
सर्व तयारी केली होती. मात्र, कामत
यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याचे
बुधवारी सकाळीच निष्पन्न झाले
आणि सत्ताधारी गटात नाराजी पसरली. कामत यांना अटकपूर्व जामीन कसा
काय मिळाला, असा प्रश्न सरकारमधील अनेकांना पडला.
सायंकाळी औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी मालवणकर यांना एक लाख रुपयांच्या लाचप्रकरणी पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने पकडले. योगायोगाने मालवणकर हे मुख्यमंत्री पार्सेकर यांचे साडू निघाले आणि सरकारमध्ये प्रचंड खळबळ उडाली. सोशल साईट्सवरून लगेच मालवणकर यांच्या छायाचित्रासह हे वृत्त फिरू लागले. पार्सेकर यांचे ते साडू असल्याची वार्ता वाऱ्यासारखी राज्यभर पसरली.
मालवणकर यांच्या पालये गावात तसेच त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या कोलवाळमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या
मांद्रे मतदारसंघातही हीच चर्चा प्रत्येकाच्या ओठी दिसून आली. (खास प्रतिनिधी)