मतांसाठी सरकारकडून बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्याचा डाव : आमदार विरेश बोरकर यांचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 05:16 PM2024-02-25T17:16:42+5:302024-02-25T17:18:09+5:30
आमदार विरेश बोरकर म्हणाले, राज्यात काही मंत्री आमदारांनी आपली वोट बॅँक करुन ठेवली आहे.
नारायण गवस, पणजी: पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी जुनी बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्यासाठी नवा कायदा आणणार अशी घाेषणा केली आहे. ती फक्त परप्रांतीय लोकांना खूश करण्यासाठी आहे. त्यांच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर घरे आहेत. ती कायदेशीर केली जाणार असे आरजीचे आमदार विरेश बाेरकर यांनी सांगितले.
आमदार विरेश बोरकर म्हणाले, राज्यात काही मंत्री आमदारांनी आपली वोट बॅँक करुन ठेवली आहे. बाहेरील लोकांना येथे येऊन मतदान कार्ड करुन दिली जातात. तसेच त्यांना बेकायदेशीर घरे बांधायला दिली जातात. नंतर काही वर्षात ती कायम केली जातात. हा भाजपचा नवा अजेंडा आहे. त्यांना स्थानिक लोकांचे काहीच पडलेले नाही. म्हणून ते परप्रांतीय लाेकांना अशी आमिषे दाखवत आहेत. या अगाेदर त्यांनी अशाच वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या.
आमदार बोरकर म्हणाले, पंचायत मंत्र्यांनी ही घरे कायदेशीर केली जाणार असे म्हटले आहे त्यातील ९० टक्के घरे ही बाहेरील ालाेकांची आहे. या लोकांनी येथे कामानिमित्त घेऊन सरकारी जमिनीत अतिक्रमण करुन घरे बांधली आहे. त्यांना या राजकीय नेत्यांनी अभय दिला म्हणून गेली अनेक वर्षे ते येथे राहत आहेत. आता मते मिळत असल्याने त्यांच्या दबावामुळे राजकीय नेते असे नवीन कायदे आणू पाहत आहेत. हा एक प्रकारे सरकारने केलेला मोठा भ्रष्टाचार आहे.
हे भाजप सरकार लाेकांची शेत जमिनी बिल्डरांना विकण्याचा डाव आहे. तसेच अनेक डोंगर कापले जात आहे. यात स्थानिकांचा काहीच फायदा नसून बाहेरील बिल्डरांचा यावर कब्जा करत आहेत. आता येणाऱ्या निवडणूकीत लाेकांनी या भाजपला धडा शिकवावा असे, असे आमदार विरेश बोरकर म्हणाले.