राज्यपालांचे पुस्तक विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार - डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:24 PM2023-08-18T17:24:20+5:302023-08-18T17:24:45+5:30
राजभवन येथे राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेले ‘हेरिटेज ट्री ऑफ गोवा’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवनमध्ये करण्यात आले.
- नारायण गावस
पणजी: गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहीलेले ‘हेरिटेज ट्री ऑफ गोवा’ हे पुस्तक गाेव्यातील युवकांना लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना गोव्याविषयी अभ्यासात संशोधन करण्यासाठी या पुस्तकाचा फायदा होणार आहे. हे पुस्तक गाेव्यातील कोकणी आणि मराठी भाषेत भाषांतरीत करावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राजभवन येथे राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेले ‘हेरिटेज ट्री ऑफ गोवा’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवनमध्ये करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद घोष, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, स्वामी महेश आनंद, फा. फिलीप नेरी फेराव, लेखक दामोदर मावजो व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल पिल्लई हे खूप अनुभवी असून त्यांनी गाेव्यातील ४०० गावांची पाहणी केली आहे. सर्व मतदारसंघात त्यांनी लोकांचा गाठी भेटी घेतल्या आहे. या काळात त्यांनी अनेक मंदिरे, चर्च तसेच इतर धार्मिक स्थळे पाहीली असून त्यानी १०० वर्षे जुनी वारसा असलेली ३१ झाडांवर हे पुस्तक लिहीले आहे. या झाडांचे महत्व या पुस्तकात आहे. त्यामुळे हे पुस्तक गाेव्यातील पुढील पिढीला ाखूप लाभदायक मार्गदर्शक ठरणार आहे .असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
गोव्याचे मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते व आमदाराकडून चांगले सहकार्य मिळत आहे. राजभवन हे आता फक्त राज्यपालांचे नाही, यात आम्ही अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. अनेक रुग्णांना आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच विविध उपक्रमही राबविण्यात आले आहे. तसेच गोव्याचा वारसा स्थळांचा अभ्यास केला म्हणून हे पुस्तक लिहिले आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.
गोवा हे वारसा स्थळांनी भरलेले राज्य आहे. गोव्यात झाडांना देवाच्या रुपाने पुजले जाते. राज्यपालांनी लिहेलेले हे पुस्तक खूप लाभदायक आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना या पुस्तकाचा लाभ होणार आहे. या पुस्तकातून पर्यटकांना गोव्याचा धार्मिक पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यटक हे फक्त आता समुद्र किनारी नाही तर मंदिर चर्च तसेच इतर वारसा स्थळे पाहण्याकडे आकर्षण वाढणार आहे, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.