सरकारने सभापतींच्या विद्यालयावर खर्च केलेले कोट्यवधी रुपयांची चौकशी करावी - प्रकाश वेळीप

By समीर नाईक | Published: February 8, 2024 04:41 PM2024-02-08T16:41:07+5:302024-02-08T16:41:20+5:30

 पणजीत गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश वेळीप बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत उटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Govt should investigate crores of rupees spent on Speaker's school - Prakash Varip | सरकारने सभापतींच्या विद्यालयावर खर्च केलेले कोट्यवधी रुपयांची चौकशी करावी - प्रकाश वेळीप

सरकारने सभापतींच्या विद्यालयावर खर्च केलेले कोट्यवधी रुपयांची चौकशी करावी - प्रकाश वेळीप

पणजी: काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी इतरांवर आरोप करण्यापूर्वी आपण काय करत आहोत याचीही जाणीव ठेवावी. राज्य सरकारने काणकोण येथील तवडकर यांच्या मालकीचे असलेले बलराम विद्यालयासाठी आतपर्यंत दिलेले ४३ कोटी रुपये कायदेशीररीत्या देण्यात आलेले आहे की नाही, हेही पाहण्याची आता गरज भासली आहे, अशी माहिती युनायटेड ट्रायबल अलाईएन्स संघटनेचे (उटा) अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली.

 पणजीत गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश वेळीप बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत उटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.  कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर २६ लाखाचे अनुदान कार्यक्रमाशिवाय दिल्याचा केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. काणकोण येथे कला व संस्कृती खात्यामार्फत अनेक कार्यक्रम झाले आहे. ज्या संस्थेला अनुदान देण्यात आले त्या संस्थेच्या खोती संगम या कार्यक्रमाला मी देखील उपस्थित होतो, तसेच यावेळी दीडहजार पेक्षा जास्त महिला या कार्यक्रमाला उपस्थित होती. दरम्यान गावठी भाज्या, विद्यार्थीचे सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. महत्वाचे म्हणजे महिला सशक्तीकरण या कार्यक्रमादरम्यान झाले. एका कार्यक्रमात तर सभापती तवडकर स्वतःह उपस्थित होते, असे वेळीप यांनी यावेळी सांगितले. 

चौकशी करायची असेल तर सरकारने काणकोणमध्ये पर्यटन खाते, कृषी खाते, क्रीडा खाते, आदिवासी खाते, या अंतर्गत आतापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमात किती रुपये खर्च झाले, याची चौकशी करावी. आम्ही अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांनसाठी आवश्यक होस्टेल व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत, हे प्रयत्नांत कोणं अडथळे निर्माण करत आहेत, याची चौकशी व्हाही. सभापती ज्या सरकारी इमारतीत आपली शाळा चालवीत आहे, त्या इमारतीचे सव्वा लाख रुपयाचे भाडे केव्हापासून देणे आहे, याची चौकशी व्हावी. काणकोण भागातील लेखक, जिल्हा सदस्यांची कोण छळवणूक करत आहे, याची चौकशी व्हावी, असे वेळीप यांनी सांगितले. 

नुकतेच गवडोंगरी आणि बार्शे ग्रामपंचायतला केंद्र सरकारतर्फे वॉटर शील्ड योजने अंतर्गत १२ कोटी रुपये कृषी खात्यामार्फत मंजूर झाले आहे, परंतु ही योजना येथे होऊ नये यासाठी कृषी खात्याच्या संचालकांवर कोण दबाव आणत आहे, याची चौकशी आज सरकारने करणे आवश्यक आहे. सांगण्याचा हेतू एवढाच की जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नये, असेही वेळीप यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
 

Web Title: Govt should investigate crores of rupees spent on Speaker's school - Prakash Varip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा