ग्रेज्युटी दिली, आता पीएफची रक्कम कधी देणार ? : प्रलंबित पीएफ मिळावा यासाठी कामगारांचे सेसा कार्यालया समोर आंदोलन
By पूजा प्रभूगावकर | Published: January 12, 2024 02:17 PM2024-01-12T14:17:20+5:302024-01-12T14:17:30+5:30
ग्रॅज्युटी दिली मात्र प्रलंबित पीएफ कधी देणार अशी मागणी करुन सेसा च्या माजी कामगारांनी पाटो पणजी येथील कंपनीच्या कार्यालया समोर आंदोलन केले.
पणजी: ग्रॅज्युटी दिली मात्र प्रलंबित पीएफ कधी देणार अशी मागणी करुन सेसा च्या माजी कामगारांनी पाटो पणजी येथील कंपनीच्या कार्यालया समोर आंदोलन केले.
कंपनीचे अधिकारी जो पर्यंत पीएफ बाबत ठोस आश्वासन देत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवू असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी १०० हून अधिक कामगार याठिकाणी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख बांदोबस्त ठेवला होता.
ई लिलावा अंतर्गत डिचोली येथील खनिज लिज वेदांताने घेतली. त्यानंतर सेसाच्या सुमारे १५४ कामगारांना जून २०२३ मध्ये कंपनीने सेवेतून कमी केले. कंपनीने या कामगारांच्या बॅंक खात्यात ग्रॅज्युटी व अन्य थकबाकी जमा केली. मात्र आठ महिने उलटले तरीही पीएफची रक्कम अजूनही दिलेली नाही. पीएफ देण्यास कंपनीने टाळाटाळ करीत आहे. कामगारांना गेल्या आठ महिन्यांपासून पगार नाही. कामगारांनी आपले घर कसे चालवायचे. अनेक कामगारांचे वय उलटून जात आहे. दुसरीकडे कामगार मिळण्याची शक्यताही नाही. कंपनीचे अधिकारी कामगारांना त्यांचा हक्काचा पीएफ का देत नाही, असा प्रश्न कामगार करीत आहे.