गोव्यात माध्यमिक विद्यालयांमध्ये वॉचमन, ग्रंथपाल नेमण्यासाठी आता अनुदान
By admin | Published: June 28, 2016 08:05 PM2016-06-28T20:05:33+5:302016-06-28T20:05:33+5:30
गोव्यात सरकारी तसेच अनुदानित माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वॉचमन नेमण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिक्षण खात्याने त्यासंबंधीची अधिसूचना
- शिक्षण खात्याची अधिसूचना
पणजी : गोव्यात सरकारी तसेच अनुदानित माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वॉचमन नेमण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिक्षण खात्याने त्यासंबंधीची अधिसूचना जारी केली असून त्यासाठी अर्थसाहाय्याची तरतूदही करण्यात आली आहे.
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत किमान २५0 विद्यार्थीसंख्या असलेल्या सरकारी व अनुदानित माध्यमिक विद्यालयांना या योजनेचा लाभ घेता येईल. वॉचमनचा पगार व इतर खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा स्वतंत्र हिशोब व्यवस्थापनाने ठेवावा लागेल. वॉचमनसाठी मस्टर रोल किंवा हजेरीपट ठेवावा लागेल. विद्यालयांमध्ये नको असलेल्या बाहेरील व्यक्तीने प्रवेश करु नये यासाठी वॉचमन नेमण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, सरकारी तसेच अनुदानित माध्यमिक विद्यालयांमध्ये ग्रंथपाल नेमण्यासाठीही सरकारने वेगळी योजना अधिसूचित केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा हेतू आहे. वरील दोन्ही योजना चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहेत. २५0 किंवा त्यापेक्षा जास्त पटसंख्या आणि वाचनालयात किमान ५ हजार पुस्तके असलेल्या माध्यमिक विद्यालयांनाच याचा लाभ घेता येईल, असे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.