आधारभुत किंमतीमुळे कृषी क्षेत्रात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 05:24 PM2023-07-29T17:24:06+5:302023-07-29T17:25:11+5:30

राज्यात सुमारे ४८ हजार कृषी कार्ड नोंदणी केलेेले शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या कृषी सुविधांचा लाभ होत असतो.

Growth in agriculture sector due to price support | आधारभुत किंमतीमुळे कृषी क्षेत्रात वाढ

आधारभुत किंमतीमुळे कृषी क्षेत्रात वाढ

googlenewsNext

नारायण गावस

पणजी: राज्यातील शेतकरी स्वालंबी व्हावे यासाठी कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना विविध याेजना सवलती राबविल्या जातात. त्यामुळे मागी काही वर्षापासून राज्यात कृषी लागवडीची संख्या वाढली आहे. तसेच अनेक लोक शेती व्यावसायाको वळत आहे. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना ६० ते ९० टक्के अनुदान कृषी उत्पादनावर दिले जाते. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. राज्यात सुमारे ४८ हजार कृषी कार्ड नोंदणी केलेेले शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या कृषी सुविधांचा लाभ होत असतो.

अनुदाना प्रमाणे राज्यातील पिकविल्याा जाणाऱ्या विविध पिकांवर शेतकऱ्यांना आधारभूत किमत दिली जाते. यात भात, अळसांदे, ऊस, पाम, सुपारी, काजू, नारळ या सर्व पिकांवर कृषी खाते आधारभूत किंमत देते. गोव्यात सर्वात जास्त काजू पिक घातले जाते. यंदा काजू दर १२५ रुपये पर्यंत होते. त्सामुळे १५० रुपये आधारभूत किमंत देण्याची येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरील २५ रुपये मिळणार आहे. तसेच सुपारीला चांगला दर मिळत आहे. या विविध कारणांमुळे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

पूर्वी कृषी परवडत नसल्याने अनेक लाेक शेती पडींग साेडायचे. पण आता जमीन लागवडी खाली येत आहे. यात सामुहीक शेती फायदेशिर ठरत आहे. आता लाेक शेती फक्त आपले कुटुंबा पुरती नाही तर व्यावसायिक पद्धतीने शेती केली जाता आहे. खात्याकडून पिकाला मिळणारी आधारभूत किमतीमुळे शेतीत वाढ झाली आहे. जनावरांकडून शेतीची नाशाढी हाेत असल्याने आता कृषी खात्याकडून साेलार कुंपणही दिले जाते. यावर शेतकऱ्यांना ७० टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे.

पिके - आधारभूत किंमत
भात -२२ प्रती किलाे
अळसांदा, -१०० रुपये प्रती किलाे
ऊस - ३००० हजार प्रती टन
पाम - ९००० प्रती टन
सुपारी - १७० प्रती किलाे
काजू - १५० प्रती किलाे
नारळ - १५ प्रती नग

वर्ष -लाभार्थी शेतकरी
२०१८ -१९ -९९४६
२०१९ -२० - ८६६०
२०२० -२१- ९१३४
२०२१- २२ - ७२८०
२०२२ -२३ - ५७६६
२०२३- २४ - ४३

Web Title: Growth in agriculture sector due to price support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा