गोमेकॉत दलालांना रोखण्यास पोलिसांचा वापर करणार, सिंधुदुर्गातील रुग्णांना शुल्कातून सवलत नाहीच - विश्वजित राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 09:06 PM2018-03-27T21:06:35+5:302018-03-27T21:06:35+5:30
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाच्या (गोमेकॉ)काही विभागांमध्ये रुग्णांना टोकनची विक्री करणारे दलाल वावरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पोलिस अधीक्षकांना आपण याविषयी सतर्क केले आहे. दलालांविरुद्ध कारवाई करण्यासाठी
पणजी - बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाच्या (गोमेकॉ)काही विभागांमध्ये रुग्णांना टोकनची विक्री करणारे दलाल वावरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पोलिस अधीक्षकांना आपण याविषयी सतर्क केले आहे. दलालांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गोमेकॉत पोलिसांची सुरक्षा ठेवण्याचा विचार आहे. सिंधुदुर्गमधील रुग्णांना शुल्कातून सवलत मिळणार नाही, पण जे रुग्ण गरीब असतात त्यांना शूल्क माफ करण्याचा अधिकार आम्ही गोमेकॉच्या वरिष्ठ अधिका-यांना दिला आहे. असे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
गोमेकॉत कितीही सुधारणा केल्या तरी, काही अपप्रवृत्ती स्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. नेमके कोणते दलाल टोकनची विक्री करतात ते अजून स्पष्ट झालेले नाही. आपण एके दिवशी भल्या पहाटे पोलिसांना घेऊन गोमेकॉ इस्पितळाला भेट देईन. तिथे पोलिसांचा पहाराही ठेवला जाईल. गोमेकॉत अजुनही काहीजण कोंबडे सोडण्याचे प्रकार करतात. अशांविरुद्धही यापुढे कारवाई केली जाईल, असे मंत्री राणो म्हणाले. गोमेकॉत विदेशी रुग्णांसाठी शूल्कवाढ करण्याचा आमचा विचार आहे. सध्या 2क् टक्के शूल्क आकारले जाते. ते विदेशी रुग्णांसाठी 5क् टक्के केले जाईल. पर्यटक म्हणून जे विदेशी गोव्यात येतात. त्यांना 5क् टक्के शूल्क देणो परवडेल, असे राणो म्हणाले. गोमेकॉ इस्पितळात आज बुधवारी सकाळी इन-हाऊस फार्मसी सुरू केली जाईल. या फार्मसीमुळे सर्व औषधे उपलब्ध होतील. शिवाय विविध प्रकारच्या उपचारांसाठी स्टील रॉड्स वगैरेही येथेच उपलब्ध केले जातील. रुग्णाला बाहेरून काहीच आणावे लागू नये असे ते म्हणाले.
महाराष्ट्राशी करार
गोमेकॉमध्ये परप्रांतीय रुग्णांना शूल्क लागू झाल्यामुळे गोमेकॉचे उत्पन्न वाढले आहे. सिंधुदुर्गमधील रुग्णांना शुल्कातून सवलत मिळणार नाही, पण जे रुग्ण गरीब असतात त्यांना शूल्क माफ करण्याचा अधिकार आम्ही गोमेकॉच्या वरिष्ठ अधिका-यांना दिला आहे. सिंधुदुर्गमधील रुग्णांवर येणारा खर्च म्हणून दोन कोटी रुपये गोमेकॉला देण्याचे साधे पत्र महाराष्ट्राने पाठवले आहे. केवळ पत्रने काही होणार नाही. करार करता येईल. आमची करार करण्याची तयारी आहे. 30 टक्के परप्रांतीय रुग्ण गोमेकॉत येतात. सिंधुदुर्गमधील रुग्णांविषयी चर्चा करण्यासाठी आपण आज बुधवारी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना भेटणार आहे. शूल्क मागे घेतले जाणार नाही पण गोव्यातील इस्पितळे इम्पेनल्ड करणे किंवा अन्य तत्सम तोडगा काढण्याच्यादृष्टीने करार करता येईल. सावंतवाडी व अन्य भागांतील जे रुग्ण अपघात झाल्यानंतर गोमेकॉत येतात त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातात, असे राणे यांनी सांगितले.