गुरुप्रसाद पावस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन आयुक्त पुरस्कार जाहीर

By किशोर कुबल | Published: November 22, 2023 01:15 PM2023-11-22T13:15:25+5:302023-11-22T13:17:13+5:30

केंद्रीय दिव्यांगजन सबलीकरण खाते तथा सामाजिक न्याय मंत्रालयाने हे पुरस्कार जाहीर केले आहेत.

Guruprasad Pavaskar announced the Best Disability Commissioner Award | गुरुप्रसाद पावस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन आयुक्त पुरस्कार जाहीर

गुरुप्रसाद पावस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन आयुक्त पुरस्कार जाहीर

पणजी : गोवा राज्य दिव्यांगजन आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावस्कर यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन आयुक्त’ म्हणून तर सचिव ताहा हाजिक यांना ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय दिव्यांगजन सबलीकरण खाते तथा सामाजिक न्याय मंत्रालयाने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. ३ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुरस्काराबद्दल पावस्कर यांचे अभिनंदन केले आहे. पावस्कर यांनी राज्यातील दिव्यांगजनांसाठी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली.

पावस्कर यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दितच गोव्यात दिव्यांगजनांसाठी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीही आयोजनाबद्दल कौतुक केले. पावस्कर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर कदंब परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील काही कदंब बसस्थानकांवरील दुकाने दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Guruprasad Pavaskar announced the Best Disability Commissioner Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा