मोबाईल अ‍ॅपद्वारे हॅकर्स तुमचा गेम करू शकतात - हॅरॉल्ड डिकॉस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 10:42 PM2019-03-07T22:42:40+5:302019-03-07T22:43:11+5:30

 हॅरॉल्ड डिकॉस्ता हे भारतातील अनेक न्यायालयांच्या संगणकीय व्यवस्थेचे सल्लागार आहेत. 

Hackers can play your game through Mobile App - Harold D'costa | मोबाईल अ‍ॅपद्वारे हॅकर्स तुमचा गेम करू शकतात - हॅरॉल्ड डिकॉस्ता 

मोबाईल अ‍ॅपद्वारे हॅकर्स तुमचा गेम करू शकतात - हॅरॉल्ड डिकॉस्ता 

Next

पणजी: 'धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ या म्हणीची प्रचिती डिजिटलायझेशनच्या या युगात लोकांना येवू लागली आहे. इंटरनेट, ऑनलाईन व्यवहार या गोष्टी व्यवहाराच्या भाग बनत चालल्यामुळे त्या सोडून चालत नाहीत, परंतु या गोष्टी हाताळताना थोडीशी जरी निष्काळजी झाली तर मोठ्या अडचणीत सापडण्याचेही शक्यता असल्याचे  सायबर तज्ज्ञ हॅरॉल्ड डिकॉस्ता सांगतात. चुकीचे  मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केल्यानेही तुमच्या बँक खात्यात हॅकर्स डोकावू शकातात, असे ते सांगतात.  हॅरॉल्ड डिकॉस्ता हे भारतातील अनेक न्यायालयांच्या संगणकीय व्यवस्थेचे सल्लागार आहेत. 

प्रश्न: सायबर सुरक्षेच्या बाबतीत सर्वात मोठा धोका कुठे आहे?
हॅरॉल्ड डिकॉस्ता : सोशल मिडियाचा बेजबाबदारपणे होणारा वापर हा पत्कारण्यात आलेला सर्वात मोठा धोका आहे. या साईटवर खाती खोलून लोक आपली छायाचित्रे, जन्मतारीख व इतर सर्व प्रकारची व्यक्तिगत माहिती टाकतात. या माहितीचा वापर करूनही सायबर गुन्हेगार आपल्या बँक खात्यात डोकावू शकतात. असे अनेक प्रकारही घडलेले आहेत. आपली गोपनीय माहिती गोपनीयच राहू द्यावी. 

प्रश्न: सायबर गुन्हेगाराना पकडणे आव्हान का ठरते?
हॅरॉल्ड डिकॉस्ता : भारत हा मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. इंटरनेटचा वापर करणारेही देशात सर्वाधिक लोक आहेत. इंटरनेटच्या वापराबद्दल व त्यातील संभाव्य धोक्यांविषयी माहिती नसलेले लोकही त्यात आहेत. त्यामुळे ही गोष्ट धोकादायक ठरू शकते. एकदा फसवणूक झाली की नंतर सायबर गुन्हेगाराचा तपास लावणे खूप कठीण असते. कारण ज्या वेबसाईटचा आपण वापर करतो त्यापैकी बहुतेकांचे सर्व्हर हे विदेशात आहेत. 

प्रश्न: ई-शॉपिंग कितपत सुरक्षित?
हॅरॉल्ड डिकॉस्ता : इ शॉपिंग हे खबरदारी घेतल्यास सुरक्षित नपेक्षा केव्हाही धोकादायक ठरू शकते. इशॉपिंग करताना आपल्या वैयक्तीक मोबाईल किंवा संगणकाचा वापर करावा. सार्वजनिक नेटवर्कवर असे व्यवहार करू नयेत. तसेच ओटीपी पद्धतीचे व्यवहार निवडा.  भेदण्यास कठीण असा पासवर्ड ठेवावा. 

प्रश्न: भीम अ‍ॅपचा वापर वाढत आहे. 
हॅरॉल्ड डिकॉस्ता : होय. भीम अ‍ॅपच्या व्यवहाराला पास कोड, मोबाईल व बँक डिटेल्स व नंतर युपीआय अशी तिहेरी सुरक्षा आहे. त्यामानाने खूप सुरक्षित आहे असे म्हणता येईल. परंतु सर्व प्रकारच्या सुरक्षा या आपल्याच अज्ञानामुळे भेदल्या जाऊ शकतात. विशेषत: मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करताना खबरदारी घेतली पाहिजे.

(मुलाखत: वासुदेव पागी)

Web Title: Hackers can play your game through Mobile App - Harold D'costa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.